बारावी विज्ञान परिक्षेत माही उराडे गडचिरोली जिल्ह्यात प्रथम .
गडचिरोली/ प्रतिनिधी – गडचिरोली शिवकृपा महाविद्यालयात बारावी विज्ञान शाखेत शिकत असलेली कु. माही हंसराज उराडे या विद्यार्थ्यांनीने १२ वि मध्ये ९२.५० टक्के घेऊन गडचिरोली जिल्ह्यातुन प्रथम क्रमांक पटकाविला. आपल्या यशाचे श्रेय आई – वडील आणि शिक्षकांना दिले. ती अनेकविध छंदात पारंगत असुन जनतेला वैद्यकीय सेवा देण्यासाठी डॉक्टर बनणार असल्याचे सांगितले. गडचिरोली जिल्ह्यातुन प्रथम आल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.