हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

प्रचारकाळात बावनकुळेंचा महाराष्ट्रभरात संघटन बैठकांवर भर! • निवडणूक नियोजनासाठी ढवळून काढला महाराष्ट्र • नमो संवाद सभा, निवडणूक नियोजनाच्या बैठकांवर विशेष भर

spot_img

 

प्रचारकाळात बावनकुळेंचा महाराष्ट्रभरात संघटन बैठकांवर भर!

• निवडणूक नियोजनासाठी ढवळून काढला महाराष्ट्र

• नमो संवाद सभा, निवडणूक नियोजनाच्या बैठकांवर विशेष भर

Advertisements

एकूण बैठका – १४७
निवडणूक नियोजन बैठका – ८६
एकूण जाहीर सभा – ६९

नागपुर –  भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लोकसभा निवडणुकीच्या काळात संघटन नियोजन आणि प्रचारासाठी संपूर्ण महाराष्ट्राचा प्रवास केला. अध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर बावनकुळे यांचा हा संघटना कार्य म्हणून सलग दुसरा राज्य प्रवास होता.

निवडणूक प्रचारकाळात बावनकुळे यांच्या दौऱ्याचे नियोजन निवडणूक टप्प्याच्या आधारे करण्यात आले होते. त्यामध्ये विदर्भातील पहिल्या टप्प्यापासून ते नुकत्याच झालेल्या मुंबई आणि परिसरातील शेवटच्या टप्प्यापर्यंत त्यांनी जाहीर सभा आणि निवडणूक नियोजनाच्या बैठका पार पाडल्या.

Advertisements

‘संपर्क से समर्थन’ या धोरणावर गाढ विश्वास असणाऱ्या बावनकुळे यांनी प्रचारा दरम्यानही कार्यकर्त्यांशी थेट संवाद आणि मतदारांना आवाहन अशी दुहेरी जबाबदारी पार पाडली.

भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी या काळात जाहीर सभांबरोबरच स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, सुपर वॉरियर्स, शक्तिकेंद्र प्रमूख, बूथप्रमुख यांच्यासाठी मार्गदर्शनपर नमो संवाद सभा घेण्यावर भर दिला. राज्यातील जवळपास प्रत्येक लोकसभा मतदारसंघात नमो संवाद सभांचे आयोजन करण्यात आले होते.

केंद्रीय निवडणूक आयोगाने १६ मार्चला देशात लोकसभा निवडणुकीची घोषणा केली. त्या दिवशी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी राज्य भाजपच्या निवडणूक नियोजन समितीची बैठक बोलावली. तेव्हापासून सुरू झालेला प्रचाराचा हा प्रवास निवडणुकीतील पाचव्या टप्प्यातील मतदारसंघांच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अर्थात १८ मे रोजी उत्तर मध्य मुंबई मतदारसंघाचे भाजप-महायुतीचे उमेदवार ऍड. उज्ज्वल निकम यांच्या प्रचारार्थ कुर्ला येथे घेतलेल्या सभेपर्यंत चालला. या दरम्यान त्यांनी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, नितीनजी गडकरी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, देवेंद्रजी फडणवीस, रामदासजी आठवले, राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, महादेव जानकर , सदाभाऊ खोत, प्रा. जोगेंद्र कवाडे, विनयजी कोरे यांच्याबरोबर सभांमध्ये भाग घेतला.

Advertisements

नमो संवाद सभांमध्ये तसेच जाहीर सभांत मांडणी करताना प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी विकासाच्या मुद्द्यांवर भर दिला. मागील दहा वर्षांच्या काळात केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारकडून महाराष्ट्राला मिळालेला निधी, गेल्या दहा वर्षांत संबंधित मतदारसंघात झालेला विकास आणि महत्त्वाचे म्हणजे, पुढील पाच वर्षांच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला विकासाचा संकल्प आदी बाबी त्यांनी आपल्या भाषणांमधून मांडल्या. प्रत्येक ठिकाणच्या सभेत यापूर्वी राज्यभर केलेल्या प्रवासाच्या अनुभवाच्या आधारे स्थानिक विकास मुद्द्यांची मांडणी हे त्यांच्या मांडणीचे वैशिष्ट्य राहिले. तसेच मोदीजींनी केलेल्या विकसित भारताच्या संकल्पाला मत द्यावे, असे आवाहन बावनकुळे यांनी राज्यभरातील मतदारांना केले.

या बरोबरच संपूर्ण प्रचारकाळात ते मुक्कामाच्या ठिकाणी संबंधित लोकसभेतील प्रमुख पदाधिकाऱ्यांची (कोअर कमिटी) बैठक घेऊन त्यात निवडणूक व्यवस्थापनाविषयी माहिती घेऊन आवश्यक त्या सूचना करत असत.

संघटन आणि संवाद हे भाजपच्या यशाचे सूत्र आहे. कार्यकर्ता या रचनेचा पाया. माझ्या महाराष्ट्र प्रवासात देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही संघटन नियोजन आणि संवादावर भर दिला. यामध्ये आमचे प्रभारी दिनेशजी शर्मा, सहप्रभारी निर्मलकुमार सुराना, जयभानसिंग पवैय्या यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केले. संघटनेतील प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्ता आमच्यासोबत पूर्ण क्षमतेने राबला. महायुतीचे घटकपक्ष यांच्याशी समन्वय साधून आम्ही नियोजन केले.
चंद्रशेखर बावनकुळे,प्रदेश अध्यक्ष भाजपा