हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

पीठ गिरणीत अडकून महिलेचा दुर्दैवी मृत्यू ◼️डोके धडापासून झाले वेगळे

spot_img

पीठ गिरणीत अडकून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

◼️डोके धडापासून झाले वेगळे

गोंदिया : पीठ गिरणीवर दळण दळत असताना महिलेची ओढणी पीठ गिरणी (आटा चक्की) च्या पट्ट्यात अडकल्याने डोके शरीरापासून वेगळे होऊन तिचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना आज, (ता.२८) दुपारी ४.३० वाजता सुमारास जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध येथे घडली. नितू हर्षल उजवणे (४६) असे मृत महिलेचे नाव आहे.

Advertisements

नवेगावबांध येथील आझाद चौकात उजवणे कुटूंबाकडून पीठ गिरणी (आटा चक्की) चे लघु व्यवसाय केले जाते. दरम्यान, नेहमीप्रमाणे ग्राहक आल्यानंतर मृत नितू ने पीठ गिरणी मशिन सुरू केली. दरम्यान, गिरणीत दळण टाकत असताना अचानक तिची ओढणी (दुपट्टा) मशिनच्या पट्ट्यात अडकला. तर क्षणातच नितूही ओढणीसोबतच मशिनच्या पट्ट्यात ओढली गेली. ज्यामध्ये तिचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, हा अपघात एवढा भयावह होता की, नितूचे डोके शरीरापासून वेगळे होवून फेकल्या गेले. या घटनेमुळे उजवणे कुटूंबियावर दु:खाचे डोंगर कोसळले असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली यावेळी नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती. या घटनेची माहिती मिळताच नवेगावबांध पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व घटनेची नोंद करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
००००००००००