हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

पावसात अतोनाथ नुकसान ,वाड़ी मध्ये पुरग्रस्त घरांचा सर्वे मदतीसाठी केले पंचनामे

spot_img

पावसात अतोनाथ नुकसान ,वाड़ी मध्ये पुरग्रस्त घरांचा सर्वे मदतीसाठी केले पंचनामे

वाड़ी ,नागपुर – 24 सप्टेंबर 2023. वाडी परीसरात शनिवारी सकाळी 4.00 दरम्यान झालेल्या ढगफुटि मुळे दत्तवाडी परीसरातील नाग नदि काठील शेकडो रहिवाशी नागरीकांच्या घरात नागरीक साखर झोपेत असतांना एकाएकीच नाग नदिच्या पुराचे पाणी शिरल्यामुळे त्यांच्या जिवनापयोगी वस्तुंचे अतोनात नुकसान झाले.गहू, तांदुळ,दाळ,,कडधान्ये,मसाले, भाजीपाला,साखर,मिठ इ.जिवनापयोगी वस्तुसह दुचाकी-चारचाकी वाहने,अंथरुण- पांघरुण, टिव्हि,फ्रिज,वाँशिंग मशिन,गँस शेगळ्या व पाणी काढण्याच्या मशीनी पाण्याखाली आल्यामुळे सर्व साहित्याची नासधुस होवुन खराब झाले.

सामाजिक कार्यकर्ते व नागरीकांनी या नैसर्गीक आपत्तीमुळे उद्भवलेल्या संकटातुन सावरण्यासाठी प्रशासनाला तातडीची मदत व नुकसान भरपाई मिळावी अशी हाक दिली.प्रशासनाने सुद्धा याची गंभीर दखल घेत रविवारी सुटिच्या दिवशीसुध्दा नुकसान ग्रस्त नागरीकांचे झालेल्या नुकसानाबद्दल पंचनामे करुन घेतले.तलाठी झाडे साहेब,संकेत बांबोळे साहेब, शिवरकर साहेब,रुतिका खंडाते ,कोतवाल रवि फाले, नगर परीषदेचे कर्मचारी,भिमरावजी जासुतकर,अशोक जाधव,कमलाकर तिजारे,भारत ढोके,मनोहर वानखेडे यांचेसवे शिवसेनाशहर प्रमुख मधु माणके पाटिल यांनी रामकृष्ण नगर,सत्यसाई सोसायटि, गजानन सोसायटि ,ओम साई सेवा भावी सोसायटि,मंगलधाम सोसायटी, सुरक्षा नगर,शुभारंभ सोसायटी, सत्य साई बाबा नगर, विठ्ठल वाडी,ज्ञानेश्वर नगर इ. नदितीरी असलेल्या पूरग्रस्त वस्त्यातील नागरीकांच्या घरोघरी जावुन झालेल्या नुकसानीचे पंचनामे तयार करण्याचे काम आज उशिरापर्यंत सुरु होते. आता प्रशासनाने कोणतीही दिरंगाई न करता पुरग्रस्तांना प्रत्यक्षात नुकसान भरपाई दयावी असे आव्हाहन शिवसेना वाडी शहर प्रमुख प्रा मधु माणके पाटिल यांनी प्रशासनाला केले आहे.

Advertisements