हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

पर्यावरण व वातावरणीय बदल विभागातर्फे “पर्यावरणीय शाश्वत परिषद 2024” चे आयोजन “शाश्वत विकासासाठी बांबू लागवडीचे महत्त्व” याविषयी तज्ज्ञांचे मार्गदर्शन

spot_img

पर्यावरण व वातावरणीय बदल विभागातर्फे

पर्यावरणीय शाश्वत परिषद 2024 चे आयोजन

शाश्वत विकासासाठी बांबू लागवडीचे महत्त्व याविषयी तज्ज्ञांचे मार्गदर्शन

Advertisements

           

            मुंबईदि. 5 : पर्यावरण व वातावरणीय बदल विभागमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळमाझी वसुंधरा अभियानफोनिक्स फाउंडेशन संस्था आणि रोटरी क्लब ऑफ बॉम्बे क्वीन सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणीय शाश्वत परिषद 2024चे आयोजन करण्यात आले आहे. येत्या 9 जानेवारी 2024 रोजी सकाळी 8.30 वाजल्यापासून ही परिषद यशवंतराव चव्हाण केंद्र येथे होणार आहे.

            चार सत्रांच्या या परिषदेचे उद्घाटन सकाळी 9.30 वा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार आहे. या परिषदेमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरीउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थितांना मार्गदर्शन करतील. परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी वन मंत्री सुधीर मुनगंटीवाररोजगार हमी मंत्री संदिपान भुमरेउद्योग मंत्री उदय सामंतकृषी मंत्री धनंजय मुंडेगोदरेज उद्योगाचे अध्यक्ष नादीर गोदरेज आणि कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल उपस्थित राहणार आहेत.

            पहिल्या सत्रामध्ये माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू हे पर्यावरण समस्यांवरील उपयांबाबत मार्गदर्शन करणार आहेत. दुसरे सत्र पर्यावरण संरक्षणामध्ये बांबूचे महत्व हा विषय असेल. या सत्रास उपमुख्यमंत्री अजित पवार मार्गदर्शन करणार आहेत. तिसरे सत्र बांबू लागवडीचा कार्यक्रम कशा प्रकारे राबवण्यात येत आहेया विषयी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे मार्गदर्शन करतील. चौथ्या आणि शेवटच्या सत्रामध्ये बांबू लागवडीच्या माध्यमातून शाश्वतता याविषयी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मार्गदर्शन करणार आहेत.

Advertisements

            या एकदिवसीय परिषदेमध्ये बांबू लागवडीचे महत्वभविष्यातील बांबू लागवडीमुळे पर्यावरणाचे होणारे रक्षणजैव इंधनासाठी असलेला बांबूचा पर्याय याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.