पत्रकार प्रशिक मकेश्वर यांच्यावरील हल्ल्यातील आरोपींना अटक करा
– महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची मागणी
अमरावती – दैनिक सकाळ समूहाचे तालुका प्रतिनिधी प्रशिक मकेश्वर यांच्यावर गावगुंडांनी प्राणघातक हल्ल्या केला. या घटनेचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ (मुंबई) अमरावती च्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला आहे. या घटनेतील आरोपींवर पत्रकार सुरक्षा कायदा २०१९ नुसार
कडक कारवाई करून अटक करण्यात यावी, या मागणीला घेऊन सोमवारी (दि.१३) रोजी पत्रकार संघाच्या वतीने पोलीस अधीक्षक ग्रामीण यांना निवेदन देण्यात आले. दोन दिवसात आरोपींना अटक करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा संघटनेचे विभागीय अध्यक्ष नयन मोंढे यांनी दिला आहे. घटनेचा नागपुरात ही निषेध व्यक्त केला .
तिवसा येथील दैनिक सकाळचे प्रतिनिधी प्रशिक मकेश्वर यांच्यावर तिवसा शहरातील काही गावगुंडांच्या कुटुंबियांकडून आज सोमवारी सकाळी राहत्या घरी जीवघेणा हल्ला चढविला. यावेळी घरी कुटुंबासमवेत असलेल्या प्रशिक मकेश्वर यांना मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे सर्वत्र असंतोषाची लाट उसळली आहे. अनेक पत्रकार बांधव, संघटना निषेध व्यक्त करीत आहे. पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत आरोपींवर तत्काळ अटक करावी, अन्यथा आगामी काळात तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांना निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी माननीय पोलीस अधीक्षक यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी विभागीय अध्यक्ष नयन मोंढे, जिल्हाध्यक्ष प्रवीण शेगोकार, कार्याध्यक्ष देविदास सूर्यवंशी, उपाध्यक्ष अली अजगर दवावाला, महासचिव शोहेब खान, शहराध्यक्ष अजय श्रुंगारे, अनिरुद्ध उगले, उपाध्यक्ष दिलीप जवंजाळ, वरिष्ठ पत्रकार संजय शेंडे, सुरेंद्र आकोडे, नितेश राऊत, अमोल देशमुख, प्रणव निर्बाण, अमर घटारे, सुरज दहाट, स्वप्नील उमप, सुधीर भारती, भैय्या आवारे, अशोक जोशी, अमोल खोडे, सुधीर गणवीर, प्रसिद्धी प्रमुख सागर तायडे, राजरत्न मोटघरे, जिल्हा महिला अध्यक्ष मीनाक्षी कोल्हे, महिला शहर सुरुची बनगैय्या, समीर अहमद, शफीक अहमद, सतीश वानखडे, सागर डोंगरे, स्वप्नील सवाळे, वैभव अवटीक, गजानन खोपे, अक्षय पुंडेकर, युवराज उमरीकर आदी उपस्थित होते.
नागपुरातही घटनेचा निषेध..डिजिटल न्यूज़ पोर्टल संघा तर्फे करण्यात आला.पत्रकार सुरक्षित नाही…पत्रकारांवर हल्ले वाढले, कारण सरकार कड़क कार्रवाई करीत नाही.पत्रकार हल्ले प्रकरण फास्ट कोर्टात चालवून आरोपिस कड़क शिक्षा व्हावी अशी मागणी सचिव विजय खवसे यांनी केली*