पत्रकार नयन मोंढे यांना राज्यस्तरीय पत्रकारीता पुरस्कार घोषीत
-चिंचवड पुणे येथे १६ मार्च रोजी राज्यस्तरीय पत्रकारांचे अधिवेशन
अमरावती(प्रतिनिधी)दि १० – राज्यात व देशात सर्वाधिक पत्रकार सदस्य संख्या असलेल्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या वतीने शनिवार(ता. १६) रोजी चिंचवड पुणे येथील आहेर गार्डन, व्हिआयपी बँकवेट हॉल येथे पत्रकारांचे राज्यस्तरीय अधिवेशन, परिसंवाद व पत्रकार पुरस्कार सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पश्चिम विदर्भ अध्यक्ष नयन मोंढे यांना संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे.
चिंचवड येथे शनिवार(ता.१६) मार्च रोजी आहेर गार्डन येथे सकाळी १० वाजता आयोजित राज्यस्तरीय अधिवेशनाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र पडणवीस यांच्याहस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून माजी खा. युवराज संभाजी राजे छत्रपती, भाजपा महामंत्री आ. श्रीकांत भारतीय, संघटक संजय भोकरे, मनसे नेते अनिल सिदोरे, संपादक आशुतोष पाटील, जेष्ठ संपादक उदय निरगुळकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, प्रमुख उपस्थिती रा.कॉ. शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे, भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप, भोसरी विधानसभा आ. महेश लांडगे, पिंप्री विधानसभा आ. अण्णा बन्सोडे, चिंचवड आ. अश्वीनी जगताप, विधान परिषद भाजपा आ. उषा खापरे उपस्थित राहतील.
दुपारी १२ वाजता अमृत काळातील माध्यम स्वातंत्र्य, भविष्य आणि पत्रकारीतेतील राम या विषयावर आयोजित परिसंवादामध्ये जेष्ठ लेखक संपादक अरविंद जगताप,विश्लेषक तथा जेष्ठ पत्रकारनिरंजन टकले, आशिष जाधव मंदार पणसे, संजय आवटे, सम्राट पडणीस, महेश म्हात्रे सहभागी होतील. दुपारी ४ वा. पत्रकार पुरस्कार सोहळयाचे वितरण राकाँ अध्यक्ष माजी मुख्यमंत्री शरदचंद्र पवार यांच्याहस्ते करण्यात येणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे राहतील. यामध्ये जेष्ठ पत्रकार मुकूंद संगोराम यांना जीवन गौरव पुरस्कार, जेष्ठ पत्रकार यदु जोशी यांना दिपस्तंभ, मुक्त पत्रकार हिनाकौसर खान यांना विवेकवादी पत्रकारीता पुरस्कार, संपादक रविंद्र आंबेकर यांना आश्वासक पत्रकारिता पुरस्कार, सामाजिक कार्यकर्ते निलेश सोमाणी यांना नागपूर विभागातून राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार घोषीत करण्यात आला आहे. सोबतच विनोद राऊत, सतिष नवले, संतोष आंधळे, विनोद इंगोले, वैभव सोनोने, प्रविण बिडवे, दिनेश केळूसकर, प्रकाश बेळगोजी, शिवराज काटकर, रोहित आठवले, सुमित्रा वसावे, अमित मोडक, नवी मुंबई दशरथ चव्हाण, अमरावती नयन मोंढे, ठाणे नितीन शिंदे, नागपूर महेश पानसे, गुजरात रमजान मंसुरी, गोवा शिवाजी नेहे, दिल्ली सौ. राजश्री चौधरी, जळगाव किशोर रायसाकडा, पुणे ग्रामीण रोहिदास गाडगे यांना राज्यस्तरीय पुरस्कार घोषीत झाले आहेत. सदर अधिवेशनाचे आयोजन महासचिव विश्वासराव आरोटे, प्रदेश उपाध्यक्ष नितीन शिंदे, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे, पिंप्री चिंचवड शहराध्यक्ष पराग कुंकूलोळ हे आहेत. सदर अधिवेनात राज्यातील संघटनेचे सर्व पदाधिकारी पत्रकार यांना उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रवीण शेगोकार यांनी केले आहे.