पंतप्रधान 12 जानेवारी रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर
महाराष्ट्रातील 30,500 कोटींहून अधिक खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन, राष्ट्रार्पण, आणि पायाभरणी पंतप्रधान करणार
मुम्बई 11 जानेवारी -गतिशीलतेत वाढ करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून अटल बिहारी वाजपेयी शिवडी – न्हावा शेवा अटल सेतूचे उद्घाटन पंतप्रधान करणार
सुमारे 17,840 कोटी रुपये खर्चाचा अटल सेतू हा देशातील सर्वात लांब पूल, तसेच सर्वात लांब सागरी पूलदेखील आहे
पूर्व मुक्त मार्गाचे ऑरेंज गेट मरीन ड्राइव्हला जोडणाऱ्या भूमिगत बोगद्याची पंतप्रधान करणार पायाभरणी
रत्ने आणि आभूषण क्षेत्राला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, पंतप्रधान सिप्झ सेझ येथे ‘भारतरत्नम‘ आणि नवीन उपक्रम व सेवा टॉवर (NEST) 01 चे करणार उद्घाटन
रेल्वे आणि पेयजलाशी संबंधित अनेक प्रकल्पांचे होणार राष्ट्रार्पण
महिला सक्षमीकरणाला अधिक चालना देण्यासाठी पंतप्रधान महाराष्ट्रात नमो महिला सशक्तीकरण अभियानाचा करणार प्रारंभ
पंतप्रधान करणार 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन
महोत्सवाची संकल्पना – विकसित भारत@2047: युवांसाठी, युवांद्वारे