हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

पंचसूत्रीच्या माध्यमातून आदिवासींचे जीवन बदलणार◼️माजी मंत्री राजकुमार बडोले यांचा संकल्प◼️ धाबेपवनी येथे आदिवासी परिषद थाटात

spot_img

पंचसूत्रीच्या माध्यमातून आदिवासींचे जीवन बदलणार◼️माजी मंत्री राजकुमार बडोले यांचा संकल्प◼️ धाबेपवनी येथे आदिवासी परिषद थाटात

गोंदिया : आदिवासींची संस्कृती, शिक्षण, स्वाभिमान, सायन्स, सन्मान आणि रोजगार या पंचसूत्रीच्या माध्यमातून आदिवासींचे जीवन बदलण्याचे संकल्प आहे. त्यासाठी आदिवासी परिषदेच्या माध्यमातून आपण एकत्र आलो आहोत. असे प्रतिपादन माजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री इंजि.राजकुमार बडोले यांनी केले. तर या आदिवासी परिषदेतून आदिवासींच्या सर्वागिण विकासाचा संकल्प घेऊन जात आपल्या घरावर ही पंचसूत्री लिहून ठेवावी, असे आवाहनही त्यांनी उपस्थित आदिवासी बांधवांना केले.

राजकुमार बडोले फाऊंडेशन च्या वतीने अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील धाबेपवनी येथे रविवार (दि. ८) आदिवासी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या आदिवासी परिषदेला मोठ्या संख्येने आदिवासी स्त्री-पुरूषांनी हजेरी लावली होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय आदिवासी ध्रुव गोंड समाज अध्यक्ष एम. डी. ठाकुर होते. परिषदेचे उद्घाटन समाजाचे प्रदेश सचिव प्रकाश गेडाम यांनी केले. कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी आमदार संजय पुराम, हनवंत वट्टी व डॉ.चंदा कोडवते होते. पुढे बडोले यांनी आपल्या भाषणातून पंचसूत्रीच्या मुद्दांवर विस्ताराने प्रकाश टाकत शिक्षण आणि रोजगाराची आवश्यकता विषद केली. ते पुढे म्हणाले, जल, जंगल आणि जमिनीचे खरे मालक तुम्ही आहात.

Advertisements

हा सातबारा तुमच्या पिढ्यांच्या नावे होता. या देशाचे मुलनिवासी तुम्ही आहात. तुमचा इतिहास वैभवशाली आहे. तो परत मिळविण्याच्या संकल्पासह विकासाच्या दिशेने पुढे चला. तुमचा भूतकाळ सुवर्ण होता. तसा भविष्यही घडवू असा विश्वास बडोले यांनी व्यक्त केला. स्थानिक प्रश्नावर बोलताना त्यांनी वनहक्क दावे त्वरीत निकाली काढून वनजमीनीचे पट्टे शेतकऱ्यांना देण्यात यावे, झाशी नगर उपसा सिंचन योजनेचे पाणी झाशी नगर, रामपुरी, येलोडी, धाबेपवनी या परिसरातील बारा गावातील शेतकऱ्यांना मिळावे. यासाठी शिल्लक काम लवकर व्हावे, आदिवासी गोंडी भाषेचे संवर्धन करण्यासाठी अनुसुची ९ मध्ये सामील करावे. याबाबत आपण आग्रही असल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिक आदिवासी तरुणांना पोलिस भरती, पटवारी, ग्रामसेवक, यांसारख्या ग्रामीण नोकरीत प्राधान्य देण्यात यावे.

याबाबत सरकारकडे पाठपुरावा करीत असून ते तुमच्या पदरात पडे पर्यत थांबणार नाही असा निर्धारही त्यांनी केला. यावेळी माजी आमदार संजय पुराम यांनी आपल्या ग्रामीण बोलीभाषेत आदिवासी समाजाचा विकास करण्यासाठी राजकुमार बडोले कटीबद्ध असल्याचा विश्वास व्यक्त केला. समाजाचा विकास करण्यासाठी आम्ही दोघेही आपल्यासोबत असल्याचे सांगून धाबेपवनी येथील अनेक आठवणींना त्यांनीं उजाळा दिला. प्रकाश गेडाम यांनी माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी मंत्री काळात केलेल्या अनेक कामांचा उल्लेख करताना लंडन येथील परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांचे घर व मुंबई येथील इंदु मील या जागेवर जगातील सर्वात मोठे डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारण्यासाठी राजकुमार बडोले यांनी केलेले कार्य समाज कधीच विसरणार नाही असे सांगितले. तर बाबासाहेबांना निवडणूकीत याच भुमीत हरविण्यात आले होते. तिथेच राजकुमार बडोले यांचा सुद्धा पराभव केला. आता ती चुक सुधारण्याचे आवाहन त्यांनी केले. डाॅ चंदा कोळवते यांनी संविधान बदलण्याचे खोटे नरेटीव्ह सेट करून समाजाला विकासापासून कोसो दूर ठेवणाऱ्या लोकांना धडा शिकविण्याचे आवाहन समाजबांधवांना केले.

कार्यक्रमाला सरपंच पपीता नंदेश्वर, सपना नाईक, पद्मा परतेकी, निशा तोडासे, डॉ नाजुक कुंभरे, छाया आमले, आशा गदवार, जयश्री देशमुख, भोजराम लोगडे व अनेक मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी १० वी १२ वी परीक्षेत प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सरपंच, उपसरपंच व सामाजिक कार्यकर्ते यांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजहंस ढोके, चेतन वडगाये, पराग कापगते, संजय खरवडे, सुदाम कोवे, बाबुराव काटेंगे, लक्ष्मण काटेंगे, विजय कापगते, तानेशजी ताराम, दयाराम काटेंगे, गणेश ताराम, अमोल डोंगरावर, जगदीश राऊत, रमेश काटेंगे, टिकाराम दर्रो, गोवर्धन सयाम, सुनील कोरेटी, अक्षय नेताम, भोजु कवडो, विठ्ठल आदमने, हिरामण टेंभुर्णे, कैलास नंदेश्वर, सुनिता कवडो, सुशीला मडावी, लहुजी मडावी, रमेश काटेंगे, सागर काटेंगे, सोनम पंधरे, भुषण करपते, अजय मसराम, जयेंद्र चौधरी, वर्षा गावडे, दिपाली दर्रो, सरीता काटेंगे, अल्का मरस्कोले, तनुजा दर्रो व अनेक समाज बांधवांनी सहकार्य केले.

Advertisements

◼️उमेदवारी शर्यतीत बडोलेंची बढती…

माजी मंत्री राजकुमार बडोले फाउंडेशन तर्फे आयोजित धम्म परिषदेच्या पाठोपाठ आता आदिवासी परिषदेला नागरिकांचा भरघोष प्रतिसाद मिळाला. यातून तीन पक्षांच्या उमेदवारी शर्यंतीत भाजपचे राजकुमार बडोले यांनी बाजी मारल्याची चर्चा परिषद स्थळी रंगली होती. मोरगाव-अर्जुनी विधानसभा मतदार संघात भाजप, राकॉं आणि शिवसेनेची महायुती आहे. या मतदार संघावर भाजप व राकॉं (अजीत पवार ) गटाने दावा केला आहे. मात्र, समाज परिषदांच्या माध्यमातून बडोले यांना समाज जोडण्यात यश आले असल्याच्या चर्चा कार्यक्रम स्थळी रंगल्या होत्या.