‘ नृत्यार्चना ‘ कुचिपुड़ी गावातुन झाली कुचिपुड़ी डांस ची निर्मिति….12 फेब्रुवरीला डांस कार्यक्रम
नागपुर तिपभ – कुचिपुड़ी नृत्य प्रसिध्द आहे.
ए . पी . निवेदिता कुचिपुडी नृत्यप्रकारात पारंगत प्रख्यात व्यक्तिमत्व असून त्यांनी १२ वर्षांपूर्वी ” श्री साई नटराज अकादमी ऑफ कुचिपुडी डान्स ” ची स्थापना केली व आजतागायत त्यांच्या विद्यार्थिनी या नृत्यप्रकाराचे धडे घेत आहेत . अनेक कलाकारांना घडविन्याचे काम करीत असल्याची माहिती शुक्रवारी तिलक पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषद मध्ये दिली.
नागपूर शाखेच्या विद्यार्थिनींनी तब्बल ३ ते ४ वर्षांच्या प्रशिक्षण व सरावानंतर २०१४ साली नृत्यांकुर या कार्यक्रमाची प्रस्तुती केली आणि २०२० पर्यंत सातत्याने दरवर्षी नागपूरकर रसिकांपुढे उत्तमोत्तम कार्यक्रम सादर केलेत . सलग ३ वर्षांच्या कालावधी नंतर १२ फेब्रुवारी २०२३ रोजी , साई सभागृह , शंकर नगर , नागपूर येथे ” नृत्यार्चना ” या कार्यक्रमाची प्रस्तुती देणारा आहेत .
आंध्रप्रदेशात वसलेले कुचिपुडी हे गाव या नृत्यप्रकाराचे मूळ असल्याने त्या गावाचेच नाव या नृत्यप्रकाराला देण्यात आले . ” नृत्यार्चना ” म्हणजे परमेश्वराला समर्पित केलेली कला .हि कला सादर करीत आहेत . श्रीमती एपी निवेदिताजींच्या २० शिष्या आहेत.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ . पी . शिवस्वरूप सिनियर रिजिनल डायरेक्टर अँड मेंबर , बोर्ड ऑफ मॅनेजमेंट ( २०१६-२०१८ )
प्रतिष्ठित अतिथी म्हणून डॉ . पी रमादेवी डायरेक्टर , श्री साई नटराज अकादमी ऑफ कुचिपुडी डान्स , हैदराबाद असतील. दीपप्रज्वलन श्रीमती कल्पना धारेश्वर डायरेक्टर प्रिंसिपल , मदर्स पेट किंडरगार्टन , दि अर्ली चाइल्डहूड सेंटर फॉर दि सेंटर पॉईट ग्रुप ऑफ स्कूल्स यांच्या हस्ते होईल. सन्माननीय अतिथी म्हणून श्री संतोष कुमार झा , मार्केट हेड विदर्भ ब्रांच बँकिंग असतील.
प्रांजली अरमरकर , प्रेसिडेंट ऑफ गुरु शिष्य परंपरा जपणाऱ्या या कलाकेंद्राकडून वेळोवेळी निरनिराळ्या क्षेत्रातील ख्यातनाम व्यक्तींचा सत्कार केला जातो . या सांप्रदायातील परंपरेनुसार यंदा भरतनाट्यम नृत्यप्रकारातील ख्यातीप्राप्त व्यक्तिमत्व गुरु रत्नम जनार्दन यांचा सत्कार करण्याचे योजिले आहे . श्रीमती ए पी निवेदिता श्री साई नटराज अकादमी ऑफ कुचिपुडी डान्स व शिष्यगण सर्व जाणकार तसेच सुज्ञ पत्रकार मंडळींना सादर आमंत्रित करीत आहेत .कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आव्हान आयोजकांनी केले