हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

नाम फाउंडेशनतर्फे विधवा शेतकरी महिलेला मदतीचा धनादेश -निर्मल बँकेच्या अध्यक्ष पूजा मानमोडे यांच्या हस्ते वितरण

spot_img
नाम फाउंडेशनतर्फे विधवा शेतकरी महिलेला मदतीचा धनादेश
-निर्मल बँकेच्या अध्यक्ष पूजा मानमोडे यांच्या हस्ते वितरण
नागपूर : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या संकल्पनेतून स्थापन झालेल्या नाम फाउंडेशनच्या माध्यमातून उमरेड तालुक्यातील एका विधवा महिलेला आर्थिक मदत करण्यात आली. निर्मल अर्बन बँकेच्या कार्यालयात आयोजित कार्यक्रमात निर्मल अर्बन बँकेच्या अध्यक्ष पूजा मानमोडे यांच्या हस्ते शेतकरी विधवा रुचिता प्रशांत आगलावे यांना धनादेश वितरित करण्यात आला. यावेळी नाम फाऊंडेशनचे समन्वयक उमेश पाटील उपस्थित होते.
रुचिता यांचे पती प्रशांत आगलावे यांनी १ मे २०२४ रोजी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली होती. त्यानंतर रुचिता यांनी नातलगांमार्फत नाम फाउंडेशनकडे मदतीची विनंती केली. फाउंडेशनने शहनिशा केल्यानंतर रुचिता यांना आर्थिक सहाय्य मंजूर केले. नाम फाऊंडेशनने केलेले आर्थिक सहाय्य हे आपल्यासाठी संजीवनी असून मुलांच्या शिक्षणासाठी ही मदत उपयोगात आणणार असल्याचे रुचिता यांनी यावेळी सांगितले.
पूजा मानमोडे यांनी नाम फाउंडेशनने घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक केले आणि समाजातील गरजू शेतकरी महिलांना सहाय्य करण्याच्या प्रयत्नांचे स्वागत केले. यावेळी रुचिता आगलावे यांनीही नाम फाउंडेशनचे आभार मानले. यावेळी वरिष्ठ पत्रकार आनंद आंबेकर, देवनाथ गंडाटे, संकेत मंगाम यांची उपस्थिती होती.