नामांतरवीर उपेंद्र शेंडे सर्वपक्षीय श्रद्धांजली सभा ५ जानेवारी ला.!
-नामदार नितीनजी गडकरी/ रामदासजी आठवले उपस्थित राहणार
नागपूर – विद्यार्थी जीवनापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या विचाराशी प्रामाणिक राहून रिपब्लिकन पक्षाच्या चळवळीसाठी रक्ताच्या शेवटच्या श्वासापर्यंत आणि थेबापर्यंत निष्ठेने प्रामाणिक राहून समाज उत्नासाठी काम केले.
त्यांच्या कार्याची पावती म्हणून 1985 साली महानगरपालिका नागपूर व 1990 मध्ये महाराष्ट्राच्या विधिमंडळात आमदार म्हणून जनतेने निवडून दिले.
त्यांनी आपल्या कार्यकाळात निस्वार्थ सेवेच्या ठसा उमटविला अशा निस्वार्थी त्यागी चळवळीच्या झंजावात व्यक्तिमत्व आपल्यातून नुकतेच निघून गेले अशा सच्चा भीमसैनिकाला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेचे आयोजन दिनांक 5 जानेवारी 2024ला ४.०० वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्वेशन सेंटर ऑटोडियरम, कामठी रोड,दुसरा माळा येथे आयोजित केले आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ताराचंद्र खांडेकर ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत भारताचे केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी भारताचे केंद्रीय राज्यमंत्री रामदासजी आठवले, लाँग मार्च प्रणेते जोगेंद्र कवाडे, एडवोकेट सुलेखाताई कवाडे माजी राज्यमंत्री तथा अध्यक्ष ओवा सोसायटी राजेंद्र गवई सचिव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूर, विकास ठाकरे शहराध्यक्ष काॅग्रेस तथा आमदार उत्तमराव गवई राष्ट्रीय सरचिटणीस खोरीपा, प्राध्यापक डॉक्टर राष्ट्रीय प्रवक्ते यांनी एन व्ही ढोक ,एका सच्चा भीमसैनिकाला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आव्हान राजन वाघमारे बाळू घरडे,अविनाश धामगाये,राजू गजभिये ,बंडोपंत टेंभुर्णी, प्रकाश कुंभे, यशवंत तेलंग नरेश वाहने डॉ. मच्छिंद्र चोरमारे, डॉ प्रदीप बोरकर यांनी आव्हान केले आहे .