हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

नानाभाऊ हा कसला खासदार दिला ? ◼️काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया ◼️ खासदार पडोळेचा गोंदियात छुपा दौरा

spot_img

नानाभाऊ हा कसला खासदार दिला ?

◼️काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया

◼️ खासदार पडोळेचा गोंदियात छुपा दौरा

Advertisements

गोंदिया, (प्रमोद नागनाथे) : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर अटीतटीच्या निवडणुकीत विद्यमान खासदार सुनील मेंढे यांना पराभूत करून निवडून आलेले खासदार प्रशांत पडोळे हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशिवाय प्रथमच गोंदियात आले. आपल्या या छुप्या दौऱ्यात खा. प्रशांत पडोळे यांनी गोंदियातील जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन यांची भेट घेऊन आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला. तसेच काही खाजगी लोकानाही भेटले.

विशेष म्हणजे, त्यांनी हा पहिलाच दौरा छुप्या पध्दतीने केला. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील कॉंग्रेस प्रदेश सचिव, जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, तालुकाध्यक्षांसह काँग्रेसच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना खासदाराच्या आगमनाची माहिती नव्हती. त्यामुळे नानाभाऊ हा कसला खासदार दिला. अशा प्रतिक्रिया कार्यकर्त्यांकडून व्यक्त होऊ लागल्या.

निवडणुकीत विजयी झाल्यानंतर एखादा खासदार किंवा आमदार पहिल्यांदाच आपल्या क्षेत्रात आल्यास त्यांचा जल्लोषात स्वागत केला जातो. त्यानुसार खासदार प्रशांत पडोळे यांचे गोंदिया येथे आगमन होताच त्यांच्या आगमनाचे जल्लोषात भव्य स्वागत सोहळा व्हायला हवा होता, जनतेचे आभार मानण्यासाठी यात्रा काढायला हवी होती, मात्र तसे काहीही झाले नाही. खासदार आले आणि गोंदियातून निघून गेल्याचे सोशल मीडियातील काही छायाचित्रांमध्ये दिसून आले. परिणामी त्यांच्या छूप्या दौऱ्यामुळे सर्वसामान्य जनता आणि काँग्रेस संघटनेत महानाराजी वर्तविली जात आहे. एकंदरीत नवनिर्वाचित खासदारांच्या या गोंदिया जिल्ह्यातील पहिल्या वहिल्या दौऱ्यात त्यांनी या बाबतची पूर्व सूचना एक दिवसा पूर्वी गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सदस्यांना दिली असती तर त्यांच्या या प्रथम दौऱ्यावेळी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांचा सत्कार समारंभ वा विजयी मिरवणूक काढली असती. पण खासदार महोदय आले आणि गेले पण काँग्रेस जिल्हा कमिटी ला या बाबत कळू सुद्धा दिले नाही. यामुळे लोकसभा निवडणुकीत त्यांच्या करिता राब राबणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता, पदाधिकारी व सदस्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. एकंदरित नवनिर्वाचित खासदारांचे आतापर्यंत चे वक्तव्य एकल्यास सर्व कामे ते काकाजी ( नाना पटोले) यांच्या निर्देशानुसारच करणार आहेत.

Advertisements

असो पण आपल्या करिता मेहनत घेणाऱ्या कार्यकर्त्यांना आपलाच अभिवादन करण्याची संधी देणे हे पण अगत्याचेच ठरते. पण खासदार महोदयांनी आपल्या पहिल्याच गोंदिया दौऱ्यात दाखविलेली गोंदिया जिल्हा काँग्रेस प्रती उदासीनता ही लक्षणीय ठरली आहे. त्यांच्या या वर्तनामुळे गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सर्व सदस्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली असल्याचे पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या बोलण्यातून दिसून आले.

◼️खासदारांच्या दौऱ्याबाबत कल्पना नाही…

शनिवारी गोंदिया भंडारा लोकसभा चे व आमच्या काँग्रेस पक्षाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे गोंदिया जिल्ह्यात आले. त्यांनी जिल्हाधिकारी,पोलिस अधीक्षक, वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांची भेट घेऊन चर्चा केल्याची माहिती इतर माध्यमातून मिळाली. पण खासदारांनी गोंदिया जिल्ह्यात आले असता गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटी ला या बाबतची माहिती दिली नाही.

Advertisements

दिलीप बनसोड, जिल्हाध्यक्ष, जिल्हा काँग्रेस कमिटी, गोंदिया

◼️एक दिवसापूर्वी पूर्वसूचना हवी होती…

नवनिर्वाचित खासदार डॉ. प्रशांत पडोळे गोंदिया जिल्ह्यात शनिवारी आले होते. अशी माहिती इतरांकडून मिळाली याचा मनाला संताप झाला. ज्यांच्या विजयाकरिता आम्ही रात्रंदिवस मेहनत घेतली. ते आम्हाला न सांगता गोंदियात येतात आणि निघून जातात ही शोकांतिका आहे. एकंदरीत त्यांनी आपल्या येण्याची सूचना आम्हाला द्यायला हवी होती.

अमर वराडे, काँग्रेस प्रदेश सचिव

◼️ हे तर्कसंगत नाही…

खासदार डॉ. प्रशांत पडोळे गोंदियात आले होते, अशी माहिती कळली पण त्यांनी गोंदिया जिल्ह्यातील त्यांच्या कार्यकर्त्यांना न भेटता निघून जाणे हे काही तर्कसंगत वाटले नाही असे मला वाटते.

ऍड. योगेश अग्रवाल, कॉंग्रेस नेता , गोंदिया
०००००००००