हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

नाग व आम नदीच्या जलसंचयन क्षेत्रातील गावांमध्ये शनिवारी आमसभा घ्या : जिल्हाधिकारी ‘चला जाणूया नदी’, ला समितीची बैठक

spot_img

नाग व आम नदीच्या जलसंचयन क्षेत्रातील गावांमध्ये शनिवारी आमसभा घ्या : जिल्हाधिकारी

‘चला जाणूया नदी’, ला समितीची बैठक

नागपूर दि. ७: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत चला जाणूया नदीला या उपक्रमांतर्गत नाग नदी व आम नदीच्या जलसंचयन क्षेत्रातील अनेक भागांमध्ये शनिवारी नागरिकांच्या आमसभा घेण्याबाबतचे निर्देश आज जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी दिले आहे.

Advertisements

‘चला जाणूया नदीला ‘ या अभियानांतर्गत आज जिल्हास्तरीय समितीची पहिली बैठक संपन्न झाली. या बैठकीला या अभियानाचे राज्यस्तरीय सदस्य डॉ प्रवीण महाजन ,नदी बचाव क्षेत्रात काम करणारे प्रद्युम्न सहस्त्रभोजने, डॉ. विजय घुगे, मुन्ना महाजन, अरविंद कडवे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.विजया बनकर यांच्यासह जिल्हास्तरीय समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.

या अभियाना अंतर्गत नद्यांना प्रदूषणामार्फत दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यासाठी वेगवेगळ्या समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. राज्य शासनाने या अभियानाअंतर्गत नागपूर जिल्ह्यासाठी नाग नदी व आम नदी अशा दोन नद्यांची निवड केली आहे.

जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी आज या संदर्भात सर्व जिल्हास्तरीय सदस्यांना त्यांच्याकडे सोपविण्यात आलेल्या कामाची आखणी व अहवाल तयार करण्याचे सांगितले. नद्यांची शुद्धता, कॅचमेंट मधील सर्व गावांमधील जनजागृतीवरही अवलंबून असल्यामुळे सर्वप्रथम या संदर्भात शनिवार दिनांक 10 डिसेंबर रोजी या नद्यांच्या ग्रहण क्षेत्रामध्ये येणाऱ्या सर्व गावांमध्ये ग्राम सभा घेण्याचे निर्देश त्यांनी दिले आहे. या अभियानाचे दर पंधरा दिवसांनी बैठका घेऊन निर्धारित वेळापत्रकानुसार कार्य करण्याची निर्देशही त्यांनी आज दिले.

Advertisements