नागरीकांच्या आरोग्याशी होणारा खेळ थांबवण्यासाठी गांडूळ खताची कास धरा – बि. एस. कोहळी मंडळ अधिकारि
शेतक-यांचा एकच ध्यास! शेत टीकेल तर पिक पिकेल व देश वाचेल.
कुही/-प्रगतीच्या नावावर व पटकन श्रीमंत होण्याच्या नादात शेतकरी कळत नकळत स्वतःच्याच आरोग्याशी खेळ खेळत आहे . शेतात घरघोष उत्पन्न यावे यासाठी अवाढव्य खताचा वापर करीत आहे त्यामुळे निघणरे उत्पन्न हे केमिकल युक्त निघते आहे व तेच अन्न आपन घेत असल्याने मानवाचे शरीर हे रोग युक्त झाल्याने शेतीत जास्त उत्पन्न घेण्याच्या नादात शरीर कमकुवत होउन आजारावर कमाई पेक्षा जास्त खर्च होउन शारीरिक वेदना सहन कराव्या लागत असून शेतीची उत्पादन क्षमता कमी होउन शेती नापीकीच्या मार्गावर आली असल्याने मायभुमीला वाचवण्यासाठी शेतक-यांनी गांडूळ खताची कास धरून शेती केल्यास नागरीकांच्या आरोग्याशी होणारा खेळ थांबवुन शेतीची कमी होणारी क्रय क्षमता थांबवू शकतो अशे मार्मिक आव्हान नुकत्याच पचखेडी येथे झालेल्या कार्यक्रमात मंडळ कुषी अधिकार बि. एस. कोहळी यांनी केले.
यावेळी शेत टीकेल तर पिक पिकेल यासाठी शेतक-यांनी ऑर्गनिक शेती करण्याचे आव्हान कृषी सहाय्यक अधिकारी नेहारे मॅडम यांनी केले.
पचखेडी येथील युवा शेतकरी उमेश मुळे या शेतक-यानी रासायनिक शेतीमुळे आरोग्याची होणारी हाणी व अधोगतीकडे जाणारे जिवनयापन याचा सखोल विचार करुन यावर्षी सेंद्रिय शेती करत ७५०० मिरचीच्या झाडाची लागवड करत सुगम कंम्पनीच्या गांडुळ खताचा वापर केला व योग्य संगोपन करुन ७५०० हजार मिरचीच्या झाडात मिरचीचे १२ तोळे करीत तब्बल ६ लाखाचे उत्पन्न झाल्याने उमेश मुळे या युवा शेतक-याची पंचक्रोशीत चर्चा असल्याने पचखेडी येथे झालेल्या कार्यक्रमात बरेच शेतक-यांचा सेंद्रिय शेती करण्याकडे कल दिसून आला.
यासाठी सुगम ऑर्गनिक (गांडूळ खताचे उत्पादक) शितल सुके यांनी रासायनिक खतापासून सावध राहून गांडूळ खत वाजवी भावात उपलब्ध करून देण्याची हमी दिली
प्रतिक्रिया १) मी गेली पंधरा वर्षांपासून शेती करतो आहे शेती करणे म्हणजे कृषि केंद्र चालक व विविध औषधांच्या कंपन्या मोठ्या करून आज ना उद्या चांगले व भरघोस उत्पन्न होईल ही आस धरुन शेतकरी केव्हा कर्जबाजारी होतो ते कळतच नाही त्यामुळे मागील वर्षापासून ऑर्गनिक शेतीकडे वळून गांडूळ खताचे वापर केल्याने पिक ही समाधान कारक होउन खर्च मात्र 100 रुपया ऐवजी 80 रुपये आला — गुणवंत लांजेवार शुद्ध युवा शेतकरी पचखेडी
२) दरवर्षीच्या अनेक कंम्पन्याच्या औषधांना बळी पळत वैतागून गेलो शेवटी ऑर्गनिक शेतीकडे वळुन शितल सुके यांच्याशी भेट झाली त्यांनी सुगम कंम्पनी च्या गांडूळ खत वापरण्याची पद्धत व वेळोवेळी मार्गदर्शन केले त्यामुळे मला ७५०० हजार मिरचीच्या झाडात ६लाख रुपयाचे उत्पन्न झाले व परिसरातील शेतक-यांची शाब्बासकीची थाप मिळाल्याने मी समाधानी आहे आता प्रत्येक शेतक-यांनी रासायनिक शेतीला पाठ फिरवत ऑर्गनिक शेतीची वाट धरण्याची गरज आहे—उमेश मुळे प्रगत मिरची उत्पादक
३) कोरोणा काळात संम्पुर्न जग बंधीस्त असतांना कित्येक नागरीकांचे जिव जातांना बघीतले त्याच काळात खुप विचार करीत असतांना शरीर हे रोगाचा प्रतिकार करण्याजोगे उरलेच नाही व याला कारण आपन घेत असलेले रासायनिक युक्त अन्न व रासायनिक खतांच्या अतिप्रमाणात वापरामुळे शेती क्षीण झालेली आहे मुख्य म्हणजे पिकांच्या वाढीकरिता अती उपयोगी सूक्ष्म जिवानुंची संख्या शेतजमिनीत अत्याधिक कमी झालेली आहे त्याला एकमात्र पर्याय शोधून काढत उत्तम गुणवत्तेचे गांडुळ खत सुगम ऑर्गॅनक नागपूर तयार केले तेव्हाच विचार केला की आपन यापासून शेतक-यांना प्रवृत करु मात्र त्यासाठी स्वतःपासून सुरुवात केली व आज घडीला सुगम ऑर्गनिक नावाची कंम्पनी सुरू करुन शेतक-यांना वाजवी भावात ऑर्गनिक चा पुरवठा करीत आहे–शितल सुके सुगम ऑर्गनिक च्या संचालीका