हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

नागझिऱ्यात सोडलेली दुसरी वाघीणही भरकटली ◼️गोंदिया शहराजवळील ढाकणी परिसरात लोकेशन

spot_img

नागझिऱ्यात सोडलेली दुसरी वाघीणही भरकटली

◼️गोंदिया शहराजवळील ढाकणी परिसरात लोकेशन

गोंदिया : जिल्ह्यातील नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा येथील (एनटी ३) वाघिणीला मागील एप्रिल २०२४ या महिन्यात निसर्गमुक्त करण्यात आले होते. ही वाघीण नागझिरा व्याघ्र प्रकल्पात स्थिरावल्यानंतर आता दोन दिवसांपूर्वी ती भरकटली असल्याची माहिती पुढे आली आहे. सद्या या वाघीणचे लोकेशन गोंदिया जवळील ढाकणी परिसरात दिसून येत असल्याचे वन व वन्यजीव विभागातर्फे सुचित करण्यात आले असून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

Advertisements

महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाप्रमाणेच इतर व्याघ्र प्रकल्पांमध्ये वाघांची संख्या वाढावी व पर्यटनाला चालना मिळावी, या हेतूने २० मे २०२३ रोजी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील दोन वाघिणी गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव- नागझिरा व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात आल्या होत्या. मात्र, काही दिवसातच त्यापैकी एक वाघीण रस्ता भरकटल्याने वन विभागाचा हा प्रयत्न अयशस्वी झाला होता. तर ती वाघीण मध्य प्रदेशातील कान्हा-केसरी व्याघ्र प्रकल्पात स्थिरावल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले होते. यानंतर ११ एप्रिल २०२४ रोजी पुन्हा एक (एनटी ३) वाघीण नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात निसर्गमुक्त करण्यात आली होती. यावेळी तीला जीपीएस कॉलर बसवून तिच्यावर २४/७ लक्ष ठेवण्यात येत होते. दरम्यान, ही वाघीण नागझिऱ्यात स्थिरावल्यानंतर आता रस्ता भरकटल्याचे तिच्या लोकेशन वरून दिसून येत आहे.

तर ती सध्या गोंदिया शहरालगत असलेल्या ढाकणी परिसरात असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भरकटलेल्या वाघिणीला व्याघ्र प्रकल्पात परतावून लावण्यासाठी वन व वन्यजीव विभागाकडून उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. तर ढाकणी परिसरात वन विभागाकडून गस्त वाढविण्यात आली असून नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन गोंदियाचे वनपरिक्षेत्र अधिकारी दिलीप कौशिक यांनी केले आहे.

◼️यापूर्वी निघाले होते जीपीएस कॉलर…

Advertisements

(एनटी ३) वाघिणीला ११ एप्रिल २०२४ रोजी नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रातील नागझिरा अभयारण्याचे कक्ष क्रमांक ९५ मध्ये निसर्गमुक्त करण्यात आले होते. दरम्यान, निसर्गमुक्त केलेल्या या वाघिणीच्या हालचालींवर सॅटेलाईट जीपीएस कॉलर तसेच व्हीएचएफ अँटिना मार्फत क्षेत्रीयस्तरावर प्रशिक्षित चमूव्दारे २४/७ सक्रियपणे सनियंत्रण सुरू होते. मात्र, दोन दिवसातच या मादी वाघिणीचे सॅटेलाईट जीपीएस कॉलर निघून सिग्नल तसेच व्हीएचएफ चमूला प्राप्त सिग्नल एकाच ठिकाणी येऊ लागले होते. त्यावेळी पाहणीदरम्यान सदर वाघिणीचे कॉलर निघाल्याचे दिसून आले होते.