हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

दीक्षाभूमी ते साची स्तूप धम्म पदयात्रा आजपासून – इंडो-एशियन मेत्ता फौंडेशन व थायलंडच्या भिक्षू संघाचे आयोजन – बुद्ध धम्मच्या प्रचार-प्रसारासाठी 450 किलोमीटरची राहणार धम्मयात्रा

spot_img

दीक्षाभूमी ते साची स्तूप धम्म पदयात्रा आजपासून
– इंडो-एशियन मेत्ता फौंडेशन व थायलंडच्या भिक्षू संघाचे आयोजन
– बुद्ध धम्मच्या प्रचार-प्रसारासाठी 450 किलोमीटरची राहणार धम्मयात्रा

नागपूर: बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा तसेच जगात शांतीचा संदेश देण्यासाठी इंडो-एशियन-मेत्ता फाउंडेशन, इंडिया तसेच थायलंड येथील वरिष्ठ बौद्ध भिक्षु संघ यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या गुरुवार 8 फेब्रुवारी 2024 रोजी दीक्षाभूमी ते साची स्तूप अशी 450 किलोमीटरची ऐतिहासिक धम्म पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.


धम्मपद यात्रेची सुरुवात पवित्र दीक्षाभूमी येथून गुरुवार दिनांक 8 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी सात वाजता होईल. यावेळी दीक्षाभूमी स्मारक समितीचे सदस्य, पदाधिकारी तसेच थायलंड येथील वरिष्ठ बौद्ध भिक्षु संघ आणि शेकडोच्या संख्येने उपासक उपासिका उपस्थित राहतील. धम्म पद यात्रेला सुरुवात झाल्यानंतर ही धम्मयात्रा महाराष्ट्र तसेच मध्य प्रदेशातील मुख्य शहरांमध्ये प्रत्येकी 30 किलोमीटरच्या अंतरावर निवास होईल. या धम्म यात्रेचे नेतृत्व थाईलैंडचे वरिष्ठ भिक्षु संघ करणार आहे. 450 किमीची ही धम्म पदयात्रा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश येथील ज्या ज्या गावांमधून मार्गक्रमण करेल त्या गावांमध्ये पुष्प वर्षावाने धम्म यात्रेचे स्वागत केल्या जाईल.

Advertisements

प्रत्येकी 30 किलोमीटर अंतरावर मार्गातील 24 मुख्य गावांमध्ये धम्म पदयात्रेतील उपासक, उपासिका तसेच भिक्षु संघ विश्राम करेल. यानंतर दुसऱ्या दिवशी परत पुढील यात्रेला प्रारंभ होईल.
धम्म पदयात्रेची सुरुवात पवित्र दीक्षाभूमी येथून होऊन ही धम्मयात्रा कोराडी, सावनेर, पांधूर्णा, सौसर, छीदवाड़ा, बैतूल, महू, होसंगाबाद, भोपाल या शहरांमधून मार्गक्रम करीत मध्य प्रदेशातील साची स्तूप येथे पोहोचेल आणि इथेच धम्म पदयात्रेचा समारोप होईल.
भारतात बौद्ध धम्माची सुरुवात झाली मात्र भारतातच बौद्ध धम्माचा हवा तसा प्रचार-प्रसार झाला नाही.

यासाठी इंडो-एशियन-मेत्ता फौंडेशन, इंडियाने बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार संपूर्ण भारतात करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. धम्म पदयात्रेच्या यशस्वीतेसाठी फौंडेशनचे सचिव नितीन गजभिये, नरेश महाजन, स्मिता वाकडे, कृणाल गजभिये व फौंडेशनचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.