हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

 1 जुलै चा दिवस उगवला…दीक्षाभुमी पेटली.! अन विकास अडकला !

spot_img

 1 जुलै चा दिवस उगवला…दीक्षाभुमी पेटली.! अन विकास अडकला !

नागपुर – 14 ऑक्टोम्बर 1956 चा दिवस उगवला अन दलित बांधव बौद्ध झाले.तेव्हापासून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित प्रबुद्ध भारत होता.प्रज्ञा शील करुणा,शिका.. संघटित व्हा.. संघर्ष करा चा मूल मंत्र बाबासाहेबांनी आम्हाला दिला.आम्ही खुप शिकलो वाटले की आता बाबा ने दिलेला धम्म आम्ही भारत भर पसरवणार मात्र 67 वर्षात तसे झाले नाही.

उलट अनेक गट निर्माण होवून दिशाहीन झाले.एवढे मात्र आम्ही शिकलो की कुठे अन्याय अत्याचार झाला की आन्दोलन करण्यास आम्ही पुढे असतो.खैरलांजी सारखे आन्दोलन जागतिक पातळीवर नेवून ठेवले.
1 जुलै 2024 चा दिवस उगवला अन दीक्षाभुमी वर जो प्रकार घडला तो महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी कधी स्वप्नातही बघितला नसेल तसा प्रकार घडला.ज्या दीक्षाभुमी वर बाबासाहेबांनी 5 लाख अनुयायी यांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली,समता ममता करुणेचा संदेश दिला,प्रज्ञा शील करुणा मंत्र दिला.

Advertisements

त्याच दीक्षाभुमी वर तोड़ फोड़ ,जाळ पोळ,मार झोड़ करण्यात आली.हजारोंच्या संख्येत भीम अनुयायी येवून बाबासाहेब यांनी दिलेल्या घटनेचा कुठलाही आदर न करता मोठा उद्रेक केला.कारण होते दिक्षाभूमिच्या विकासा मध्ये अंडर ग्राउंड पार्किंगचे…हा मुद्दा आपसात बसवून सोडवू शकले असते मात्र तसे झाले नाही.का झाले नाही?कोणी होवू दिले नाही?हा संशोधनाचा विषय आहे.मात्र जे दीक्षाभुमीवर 1 जुलै ला घडले तो प्रकार संपुर्ण जगात प्रसिद्धी माध्यमाने झपाट्याने पोहचवला..जिथे शांतिचा संदेश मिळतो तिथेच क्रांति दिसून आली तेही फक्त पार्किंग करिता.

दीक्षाभुमीच्या विकासाला समर्थन करणाऱ्या लोकांना जी भिति होती शेवटी तेच झाले.राज्य सरकार ने अधिवेशनात पार्किंग व कामाला स्थगिति दिली. आता पुढे विकास होणार की नाही ? खोदलेले गड्ढे बुजवने गरजेचे झाले आहे.मातीचे ढिगारे हटवने ही आवश्यक आहे.आता पुढे क़ाय होणार असाच प्रश्न काही आंबेडकरी जनते सामोर उभा ठाकला आहे.
आंबेडकरी जनतेच्या भावना पार्किंग होत असल्याने जेवढया दुखावल्या नसेल त्या पेक्षा दीक्षाभुमी वर जो प्रकार घडला त्याने दुखावल्या आहे.
कामावर स्थगिती आली..आता यात राजकारण घुसले,नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया देवून राजकारणी पोळया शेकने सुरु केले या कड़े मात्र आंबेडकरी जनतेने लक्ष देण्याची फार गरज आहे.आता दीक्षाभुमीचा विकासा होणार की नाही ?असेही प्रश्न निर्माण होत आहे.

एक आंबेडकरवादी..!

Advertisements