हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

दिलखुलास’, ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांची मुलाखत

spot_img

दिलखुलासजय महाराष्ट्र‘ कार्यक्रमात

कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांची मुलाखत

मबईदि. 3 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास‘ आणि जय महाराष्ट्र‘ कार्यक्रमात शाश्वत पर्यावरण विकास परिषद‘ या विषयावर कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

Advertisements

            पर्यावरण संरक्षणासाठी राज्य शासनामार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळपर्यावरण व वातावरणीय बदल विभागमहाराष्ट्र शासन आणि लातूर जिल्ह्यातील फिनिक्स फाऊंडेशन संस्थेच्या सहकार्याने मुंबईत 9 जानेवारी 2024 रोजी शाश्वत पर्यावरण विकास” परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या  परिषदेच्या माध्यमातून खासगी क्षेत्रातील अग्रणी उद्योगखासगी व सरकारी संस्थापर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती व संस्था आणि नागरिकांमध्ये जनजागृती आणि मार्गदर्शन याबाबतची माहिती दिलखुलास‘ आणि जय महाराष्ट्र‘ कार्यक्रमात कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष श्री. पटेल यांनी दिली आहे.

            दिलखुलास’ कार्यक्रमात श्री. पटेल यांची मुलाखत गुरुवार दि. 4शुक्रवार दि. 5 आणि शनिवार दि. 6 जानेवारी 2024 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व न्यूज ऑन एआयआर‘ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. तर जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत शनिवारदि. 6 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 7.30 वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. निवेदक श्रीकांत कुळेकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.