दिक्षा भुमी चे खरे शिल्पकार बाबू हरदास आवळे –
प्रविण आवळे
.नागपूर दि.१ जुलै – डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ ला नागपूर येथील दिक्षा भुमी ला लाखो बौद्ध अनुयायी यांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली ऐतिहासिक क्रांती घडवून आम्हाला पवित्र स्थान म्हणून दिक्षा भुमी अर्पण केली हे जितके खरे आहे परंतु दिक्षा सोहळा संपन्न झाल्यानंतर हि दिक्षा भुमी ला स्थानिक नेत्यांना विसर पडला होता कित्येक वर्षे या दिक्षा भुमी कडे कोणत्याही नेत्यांचे लक्ष नव्हते ती जमीन संपादनास कोणी पहल केली नाही हि जमिनीवर अतिक्रमण केव्हाही झाले असते अँड बाबू हरदास आवळे यांनी रातोरात या जमिनीवर कुपन टाकून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा बसवला आज दिक्षा भुमी त्यांच्या मुळे साबूत राहिली असे प्रतिपादन आंविमो आणि आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा चे विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष प्रवीण आवळे यांनी केले.
ते आवळे यांच्या जयंतीनिमित्त कमाल चौक येथील त्यांच्या पुतळ्याला अभिवादन करताना बोलत होते.या प्रसंगी आंविमो आणि आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी आवळे बाबू यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले धर्मा बौद्ध बागडे यांनी आवळे बाबू अमर रहे या घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला कार्यक्रमात प्रकाश कांबळे,प्रा.रमेश दुपारे,अजय वंजारी,संजय मोटघरे,भागनबाई मेश्राम, महानंदा इलमकर आणि मोठ्या संख्येने महिला पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते.