दहा लाख कार्यकर्ते बनावं अभियानाच्या चौथ्या टप्पा वर्धा येथून प्रारंभ.
.
वर्धा दि.१०मार्च 23 – आतापर्यंत राजकीय लोकांनी सदस्य जोडले ते फक्त मंत्री खासदार, आमदार, बनण्यासाठी पंरतू आंविमो आणि आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा दहा लाख कार्यकर्ते तयार करणार ते फक्त संविधानाने दिलेले अधिकार हिसकावून घेण्यासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्यासाठी असे प्रतिपादन आंविमो चे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी केले .
ते वर्धा शहरातील पॅंथर चौक येथून सावित्रीबाई फुले यांच्या स्मृति दिनानिमित्त दहा लाख कार्यकर्ते बनावं अभियानाच्या चौथ्या टप्पा प्रारंभ करताना बोलत होते.या प्रसंगी आंविमो वर्धा जिल्हा अध्यक्ष प्रदीप धुपे, महिला मोर्चा वर्धा जिल्हा अध्यक्षा सुनिता गायकवाड, शहर अध्यक्षा जया साठे, सचिव सुरेखा झांबरे, प्रिती थुल, महिला मोर्चा यवतमाळ जिल्हा अध्यक्षा ज्योती वागदे, कंळब तालुका उपाध्यक्ष शितल बूरबूरे, पुलगाव येथिल अनिता रंगारी, नंदा बनसोडे, किरण गजभिये, वंदना भगत,नसिम शेख, प्रिती मानवटकर,नैन धुपे,गुनंवत वघरहांडे, विशेष मार्गदर्शक अँड सुरेश घाटे राजु पांजरे, धर्मा बागडे, भाऊराव बोरकर, उपस्थित होते,