हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

दहशतवादावर पटोलेंनी बोलू नये; कोणत्याही मंचावर वाद करण्यास तयार!- चंद्रशेखर बावनकुळे यांचे आव्हान

spot_img

 

दहशतवादावर पटोलेंनी बोलू नये;
कोणत्याही मंचावर वाद करण्यास तयार!- चंद्रशेखर बावनकुळे यांचे आव्हान

• कॉंग्रेसचा प्रत्येक जिल्ह्यात एक मुख्यमंत्री
• भाजपाचे काम नेहमीच राष्ट्रकल्याणासाठी

नागपुर – कॉंग्रेसच्या काळात दहशतवादी भारतात घुसत होते. कसाबने दहशतवादाची पेरणी कॉंग्रेसच्या काळातच केली व मुंबई बॉम्बस्फोट घडविले. षडयंत्र करणाऱ्या पाकिस्तानच्या घरात घुसून मारण्याची ताकद पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वात भारताने निर्माण केली आहे. नाना पटोले यांनी दहशतवादावर बोलू नये, कॉंग्रेसने नार्केतपणामुळे त्याच्या काळात आतंकवाद देशात व राज्यात कसा पसरविला यावर त्यांच्याशी कुठेही त्यांच्याशी डिबेट करण्यास तयार आहे, वेळ त्यांनी सांगावी, असे आव्हान चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

Advertisements

ते नागपूर येथे माध्यमांशी बोलत होते. कॉंग्रेसच्या काळात देशात व राज्यात श्री बावनकुळे म्हणाले, नाना पटोले यांना भाजपा कळली नाही म्हणून ते कॉंग्रेसमध्ये गेले. कुण्या एका व्यक्तीसाठी भाजपा काम करीत नाही. पाय ओढण्याचे काम केवळ कॉंग्रेसमध्येच केले जाते. त्यांच्या पक्षात १५ मुख्यमंत्री आहेत, प्रत्येक जिल्ह्यात एक मुख्यमंत्री आहे. भाजपामध्ये कधीही स्फोट होणार नाही, असा दावा करून श्री बावनकुळे म्हणाले, भाजपा नेहमीच राष्ट्र व राष्ट्रकल्याणासाठी काम करते.

श्री बावनकुळे म्हणाले, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष मुंबई दौऱ्यात गणेश दर्शनासाठी आले होते, त्यांनी बैठका घेतल्या या केवळ अफवा आहेत. भाजपामधून कुणाला उमेदवारी द्यावी हा निर्णय संसदीय समितीचा आहे, जे घडलेच नाही त्याच्या बातम्या करू नका असेही आवाहन त्यांनी केले. सर्व पक्षातील कार्यकर्त्यांना त्यांचा नेता मुख्यमंत्री व्हावा असे वाटत त्यात डिवचण्यासारखे काहीच नाही.

• भाजपा पंकजाताईंच्या सदैव पाठीशी
भाजपा नेत्या पंकजा मुंडे या आमच्या नेत्या असून त्यांनी खूप काम केले आहे. भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता त्यांच्या पाठीशी आहे. त्यांच्या बोलण्याचा कोणताही दुसरा अर्थ किंवा विपर्यास करू नये. त्यांच्या रक्तात भाजपाच आहे. साखर कारखाना अडचणीत असताना त्यांना नोटीस मिळाली आहे, याविषयावर मी त्यांच्याशी चर्चा करणार आहे, त्यांच्याबाबत कोणतिही अफवा पसरवू नका. पक्षाच्या प्रत्येक कामात त्या तत्पर आहेत.

Advertisements