हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

त्या उमेदवाराचा मुक्काम पोस्ट इथला नाही त्यामुळे तो इथले काम करणार नाही ◾️खा.प्रफुल पटेल यांची काँग्रेस उमेदवार दिलीप बनसोड यांच्यावर नाव न घेता टीका

spot_img

त्या उमेदवाराचा मुक्काम पोस्ट इथला नाही त्यामुळे तो इथले काम करणार नाही

◾️खा.प्रफुल पटेल यांची काँग्रेस उमेदवार दिलीप बनसोड यांच्यावर नाव न घेता टीका

गोंदिया : इथे कॉंग्रेसने उमेदवार आणला आहे, तो उमेदवार अर्जुनी-मोरगाव किंवा सडक अर्जुनीचा आहे का, त्या उमेदवाराचा मुक्काम पोस्ट इथला नाही त्याच्यामुळे इथले काम करणार नाही. आम्ही लंडन, अमेरिकेला जातो पण काम आपल्या जिल्ह्यातील करतो. तसे त्या उमेदवाराचा मुक्काम पोस्ट ज्या ठिकाणाचा आहे तिथे आधी काम करणार आहे. अशी टीका खा. प्रफुल्ल पटेल यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार दिलीप बनसोड यांच्यावर नाव न घेता केली.

Advertisements

महायुतीचे उमेदवार राजकुमार बडोले यांच्या निवडणूक प्रचारार्थ काल, (ता. १०) सडक अर्जुनी तालुक्यातील कोकणात येथे आयोजित प्रचार सभेत खा. पटेल बोलत होते. यावेळी मंचावर महायुतीचे उमेदवार राजकुमार बडोले उपस्थित होते. पुढे बोलताना खा. पटेल म्हणाले की, आम्हाला आयाराम गयाराम नकोत, ते सगळे आमचेच चेले-चपाटे आहेत. आम्हीच त्यांना राजकारणामध्ये आणले, सभापती, आमदार केले मग ते दोन-तीन वेळा निवडणूक हरले आणि आता इकडे पुन्हा हरायला आले असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, त्यांनी नाव न घेता आमदार मनोहर चंद्रिकापूरे यांच्यावरही टिका करत एक आमच्याकडे होते, आम्ही त्यांना नवीन म्हणून संधी दिली. मात्र, त्यांना धीर नाही,

आता मोटार सायकल गाडीचा जमाना आहे, ऑटोमॅटीक गाडीचा जमाना आहे. सर्व काही ऑटोमॅटीक पाहतात. त्यांना ऑटोमॅटीक आमदार व्हायचे आहे. त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे, काम करणारा व्यक्ती राजकुमार बडोले आहे. दहा वर्ष ते आमदार राहिले, पैकी पाच वर्षे मंत्री होते. सगळ्यांचे ओळखीचे आहेत. स्वभाव चांगला काम उत्तम त्यामुळे त्यांना निवडून द्या असे आवाहन खा. प्रफुल्ल पटेल यांनी केले.
०००००००००