हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

‘त्या’ उड्डाणपूलाच्या निकृष्ट बांधकामाच्या विरोधात शिवसेना उबाठाचे आंदोलन ◼️ संबंधित कंपनीवर कारवाई करण्याची मागणी

spot_img

‘त्या’ उड्डाणपूलाच्या निकृष्ट बांधकामाच्या विरोधात शिवसेना उबाठाचे आंदोलन

◼️ संबंधित कंपनीवर कारवाई करण्याची मागणी

गोंदिया : मुंबई -कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर बनत असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आज, सोमवार ( दि ९) आंदोलन करून संबंधित कंत्राटदार कंपनीवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. तर कारवाई न झाल्यास संबंधित विभागाच्या कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा देण्यात आला.

Advertisements

मुंबई-कोलकत्ता राष्ट्रीय महामार्गावर कोहमारा ते देवरी पर्यंत नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचा जंगल परिसर असल्याने वन्य प्राण्यांना आवागमन करण्याकरिता उड्डाणपुलाचे बांधकाम करण्यात येत आहे. दरम्यान, नैनपुर जवळील एक पूल वाहतुकीसाठी दोन महिन्यापूर्वी सुरू करण्यात आला होता. मात्र त्यावर मोठ्या भेगा पडल्याने हा पुल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तर एकेरी मार्गाने वाहतूक सुरू आहे. दोन महिन्यातच पुलावर भेगा पडल्याने कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज, सदर उड्डाणपुलावर शिवसेना जिल्हा प्रमुख सैलेश जायस्वाल यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी या कामाची तात्काळ चौकशी करण्यात यावी, संबंधित कंत्राटदार कंपनीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. तर मागणी पूर्ण न झाल्यास राष्ट्रीय राज्य महामार्ग मार्ग प्राधिकरणच्या कार्यालयाला कुलूप ठोकण्यात येईल असा इशारा शिवसेनेतर्फे देण्यात आला.
…….