तनाएराच्या नागपुरातील पहिल्या स्टोरचा शुभारंभ ..! भारतामध्ये हातमागासाठी सर्वात प्रसिद्ध असलेल्या विविध ठिकाणाची सर्वोत्तम डिझाइन्स एकाच ठिकाणी उपलब्ध होण्याची सुवर्णसंधी नागपूरकरांना
नागपूर २ ९ एप्रिल – टाटा उद्योगसमूहातील एक सदस्य आणि भारतातील आघाडीचा एथनिक वेयर बँड तनाएराने महाराष्ट्रात रिटेल विस्ताराची वाटचाल कायम राखत नागपूर शहरामध्ये आपल्या पहिल्या स्टोरचा शुभारंभ केला आहे . महाराष्ट्र राज्यात हे या बँडचे पाचवे स्टोर आहे .
२७०० चौरस फुटांचे नवे तनाएरा स्टोर स्टेशन रोडवर किंग्सवे येथे आहे . भारत सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे माननीय मंत्री श्री . नितीन गडकरी यांच्या शुभहस्ते स्टोरचे उदघाटन करण्यात आले . तनाएराचे रिटेल हेड श्री . अनिर्बन बॅनर्जी आणि टायटनचे वेस्ट विभागाचे रिजनल बिझनेस हेड श्री . नीरज भाकरे यावेळी उपस्थित होते . मुंबई आणि पुण्यामध्ये सुरु करण्यात आलेल्या तनाएरा स्टोर्सना ग्राहकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे . कापड उद्योगाचे केंद्रस्थान आणि भारतीय हस्तकला व हातमागाच्या चाहत्यांसाठी खरेदीचे अतिशय आवडीचे ठिकाण अशी ओळख असलेल्या नागपुरात तनाएराने आपले स्टोर सुरु करणे हा या बँडच्या वाटचालीतील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे .
एका ऐतिहासिक वास्तूमध्ये सुरु करण्यात आलेल्या या स्टोरमध्ये जुन्या काळातील व्हिक्टोरियन स्थापत्य शैलीचा आणि महाराष्ट्रातील लोकप्रिय आदिवासी कला वारली चित्रांचा समृद्ध सांस्कृतिक मिलाप घडवून आणण्यात आला आहे . या स्वदेशी कलाकृर्तीमधून प्रदेशाच्या सांस्कृतिक व कलात्मक वारशाचा सन्मान करण्यात आला आहे . उत्कृष्ट अभिरुची दर्शवणारे वातावरण आणि क्लासिक व आधुनिक कपड्यांची विशाल श्रेणी तनाएरा स्टोरची खास वैशिष्ट्ये आहेत .
कारागिरांनी हातांनी विणलेल्या साड्या , ब्लाउज , रेडी – टू – वेयर आणि अन्स्टिच्ड कुर्ता सेट्स यांची संपूर्ण श्रेणी शुद्ध व नैसर्गिक कापडांपासून तयार करण्यात आली आहे .. कपड्यांविषयी विशेष चोखंदळ असणाऱ्या ग्राहकांच्या खास आवडीनिवडी याठिकाणी नक्की पूर्ण होतात . तनाएरा नागपूरमध्ये परंपरा आणि आधुनिकता यांचा अनोखा मिलाप घडवून आणण्यात आला आहे , याठिकाणचे प्रत्येक कलेक्शन काळजीपूर्वक डिझाईन केलेले व खास निवडण्यात आलेले आहे .
त्यामुळे याठिकाणी येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला आकर्षक व अविस्मरणीय खरेदीचा अनुभव मिळतो . हातमाग , विणकामासाठी प्रसिद्ध असलेल्या भारतातील विविध ठिकाणची उत्तमोत्तम डिझाइन्स एकाच ठिकाणी उपलब्ध करवून देऊन हे स्टोर अवघ्या भारताचे दर्शन एकाच ठिकाणी घडवते . पैठणी , महेश्वरी , कांजीवरम ,बनारसी , दक्षिणी सिल्क , चंदेरी , इक्कत , पटोला , जामदानी आणि टसर असे विविध लोकप्रिय प्रकार या एकाच स्टोरमध्ये खरेदी करता येतात . भारत सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे माननीय मंत्री श्री . नितीन गडकरी यांनी भारतीय हस्तकलेला प्रोत्साहन देण्याच्या तनाएरा बँडच्या प्रयत्नांचे कौतुक केले . ते म्हणाले , ” नागपुरात तनाएराच्या पहिल्या स्टोरचे उदघाटन करताना मला आनंद होत आहे .
देशभरातील विणकर आणि कारागिरांसोबत हा ब्रँड काम करत आहे याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो . टाटा समूहातील ब्रँड , तनाएरा भारतातील हातमाग आणि विणकामाची समृद्ध परंपरा जपण्यासाठी व स्थानिक कारागिरांना सक्षम करण्यासाठी पुढाकार घेत आहे हे पाहून मला खूप आनंद होत आहे . ” तनाएराचे रिटेल हेड श्री . अनिर्बन बॅनर्जी यांनी सांगितले , ” महाराष्ट्राच्या विदर्भामध्ये आमचे पहिले स्टोर सुरु होत आहे ही खूपच आनंदाची बाब आहे . भारतातील हातमागाची समृद्ध परंपरा आणि कारागिरांनी हातांनी तयार केलेले सर्वोत्तम कपडे आम्ही नागपूरकरांसाठी सादर करत आहोत . या भागातील चोखंदळ , अभिरुचीसंपन्न ग्राहकांसाठी आम्ही खास निवडण्यात आलेली , अनोखी , अस्सल डिझाइन्स प्रस्तुत केली आहेत . प्रसंग कोणताही असो , मनाजोगती , उत्तम खरेदी करण्याचे हमखास ठिकाण अशी या स्टोरची ओळख बनावी ही आमची इच्छा आहे .
नागपुरातील पहिल्या स्टोरच्या शुभारंभाच्या निमित्ताने तनाएरा बँडतर्फे गोल्ड कॉईन ऑफर देखील सुरु करण्यात आली आहे . २ ९ एप्रिल ते ३ मे २०२३ दरम्यान २०,००० रुपयांच्या खरेदीसोबत ०.२ ग्राम वजनाचे तनिष्कचे सोन्याचे नाणे भेट म्हणून दिले जाणार आहे .