हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

डॉ. मिर्झा यांची 17 पुस्तकांची मिर्झा एक्सप्रेस !

spot_img

डॉ. मिर्झा यांची 17 पुस्तकांची मिर्झा एक्सप्रेस !

हसवत हसवत प्रबोधनाच्या माध्यमातून मनोरंजन करण्याची हातोटी असणारे आमचे दैवत,गुरु,गावकीतील वडील बंधू डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचा कोणताही जांगडबुत्ता जगावेगळा असतो ! महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेले, विदर्भ, महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांनी वैदर्भीय बोलीला आपल्या खुमासदार शैलीत देशभर सादर केले. त्यांच्या मिर्झा एक्सप्रेस या कार्यक्रमातून महाराष्ट्रभर ते कायम चर्चेत असतात.

शेती,माती,जाती,धर्माची अधोगती आणि जगण्याची ससेहोलपट सहन करणाऱ्या शेतकऱ्यांपासून तर सामान्य नागरिकांच्या वेदना त्यांच्या लिखाणातून सुलभतेने विनोदी वेष्टनात उमटत असतात.
राजकारण,समाजकारण,सामाजिक समस्या यावर त्यांचे गोळीबंद नर्मविनोदी भाष्य म्हणजे त्यांच्या दोन लाईनच्या भावणाऱ्या वऱ्हाडी कविता. त्यांच्या या काव्य प्रपंचाला 50 वर्ष पूर्ण होत आहे. आपल्या काव्यप्रतिभेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात महाराष्ट्राला हसवत हसवत अंतर्मुख करण्याची ही कला आता डॉ. मिर्झानी पुस्तकातूनही वाचकांपुढे आणली आहे.

Advertisements

त्यांच्या विनोदी कविता आणि किस्स्यांची एकूण 17 पुस्तके ( पूरा सटच्या सट! ) एकाचवेळी प्रकाशित झाली आहेत. पुस्तक प्रकाशनाचे सोहळे त्यांना पटत नाही. त्यामुळे नुकत्याच आमच्या गावच्या अर्थात धनज माणिकवाड्याच्या यात्रेतील दरवर्षी होणाऱ्या वार्षिक छोटेखानी कविसंमेलनात त्यांनी आपलं हे लेखन त्यांनी आपल्या जन्मगावाला, बालपणच्या मित्रांना व शिक्षकांना अर्पण केलं. (डॉ. मिर्झा हे विदर्भसंत श्री.फकिरजी महाराज संस्थान धनज-माणिकवाडा ट्रस्टचे ३० वर्षांपासून उपाध्यक्ष आहेत ) लाखे प्रकाशन नागपूर व मेधा प्रकाशन अमरावती यांनी ही १७ पुस्तके प्रकाशित केली आहेत.

पुस्तके, पुस्तकांचा संच मिळविण्यासाठी 9730337909 या संपर्क क्रमांकावर संपर्क साधता येईल. मिर्झाप्रेमी आणि मिर्झापंथीय लोकांसाठी ही एक पर्वणी आहेच.मात्र गेल्या पन्नास वर्षाचा विदर्भाच्या सामाजिक, राजकीय वाटचालीचा काव्यस्वरूपी हा कालखंड या 17 पुस्तकातून अनुभवायला मिळतो. त्यामुळे वऱ्हाडी भाषेच्या हा लेखन साठा, त्यांच्या प्रेरणादायी कवितांचा संच, आपल्यापर्यंत पोहोचावा त्यासाठी हा माझा लेखप्रपंच… ! आणि हो 50 वर्ष काव्य क्षेत्रात पूर्ण केल्यासाठी त्यांचे अभिनंदनही करणे आवश्यक ठरते. मित्रांनो ! एक कॉल तो डॉक्टर मिर्झा को (9423434350 ) बनता है..
डॉ.मिर्झा रफी अहमद बेग यांचे 17 पुस्तकांसाठी पुन्हा एकदा अभिनंदन !

प्रवीण टाके, जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड

Advertisements

साभार फेसबुक , टाके सर