हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

डेटा बेस मॅनेजमेंटच्या माध्यमातूनच विकासाचे ध्येय गाठणे शक्य

spot_img

डेटा बेस मॅनेजमेंटच्या माध्यमातूनच विकासाचे ध्येय गाठणे शक्य
-जागतिक बँक चमूकडून विविध योजनांच्या अंमलबजावणीची माहिती
-धोरण आणि अंमलबजवणीमध्ये सांख्यिकी माहितीचा आधार आवश्यक

नागपूर दि.२९ : विकासाचे अपेक्षित ध्येय साध्य करण्यासाठी डेटाबेस मॅनेजमेंट सक्षम असणे आवश्यक आहे. योजना आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी करतांना जिल्हास्तरावरील सांख्यिकीचा आधार घेतला जातो. त्यामुळे अद्ययावत माहिती गोळा करणारी यंत्रणा अधिक सक्षम असणे आवश्यकता असून त्याआधारावरच विविध योजनांच्या अंमलबजावणी करणे सुलभ झाले असल्याची माहिती विभागीय आयक्त श्रीमती विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज दिली.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात जागतिक बँकेच्या चमूने विभागातील जिल्हाधिकारी तसेच अर्थ व सांख्यिकी, जिल्हा नियोजन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत डेटा बेस व्यवस्थापन, राज्यस्तरीय सांख्यिकीय परिसंस्थेचे बळकटीकरण आणि आधुनिकीकरण यासंदर्भातील आव्हानांचा शोध, डेटाबेस च्या साहाय्याने राज्यात धोरण आणि अंमलबजावणी यासंदर्भात चर्चा करण्यात आली.

Advertisements

जागतिक बँकेचे वरिष्ठ सांख्यिकीय प्रमुख थॉमस डॅनियलवित्झ, आर्थिक विकास विभागाच्या प्रोग्राम मॅनेजर श्रीमती मालर विरप्पन, राष्ट्रीय सांख्य‍िकीय प्रणालीच्या ग्लोबल एक्सपर्ट प्रा. पाउल च्युंग, पॉवर्टी ॲण्ड इक्वीटी ग्लोबल प्रॅक्टीसच्या श्रीमती श्रेया दत्ता, अर्थ सांख्यिकी विभागाचे सहसंचालक प्रमोद केंभावी, शासकीय विज्ञान महाविद्यालयाच्या सांख्यिकी विभागप्रमुख डॉ. संध्या दाभे यावेळी उपस्थित होत्या.
जिल्ह्याचा समतोल व सर्वांगिण विकास करतांना डेटा बेस मॅनेजमेंट सक्षम असणे आवश्यक आहे. यासंदर्भात जागतिक बँकेच्या प्रतिनिधींनी जिल्ह्यातील डेटा बेस संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना प्रश्नावली दिली होती.

यामध्ये योजना व प्रत्यक्ष अंमलबजावणी करतांना तसेच धोरण ठरवतांना उपलब्ध डेटाचा आधार त्यासोबतच निती आयोगातर्फे ठरविण्यात आलेल्या 42 इंडिकेटरच्या अंमलबजावणीसाठी उपलब्ध डेटा प्रणालीचा वापर, जिल्हा नियोजन मंडळाची रचना तसेच अंमलबजावणीची प्रत्यक्ष पद्धत याबद्दल माहिती घेतली.
केंद्र व राज्य स्तरावर राबविण्यात येणाऱ्या योजना व त्यासाठी वापरण्यात येणारा डेटाबेसचा आधार व त्यानुसार अंमलबजावणी यासंदर्भात सविस्तर माहिती घेतांना आरोग्य, कृषी, ग्रामविकास आदी योजनांसाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या प्रणाली व डेटा याचा वापर करतांना विकासाचे ध्येय गाठणे शक्य आहे का अथवा या प्रणालीमध्ये बदलाची आवश्यकता आहे काय, यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. उपलब्ध माहितीचे विश्लेशन तसेच यापद्धतीमध्ये अधिक सुधारणा व व्यापकता आदीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

नागपूर विभागात राबविण्यात येत असलेल्या ई-पीक पाहणी तसेच ई-पंचनामा या उपक्रमांतर्गत माहिती गोळा करतांना यामध्ये असलेली अचूकता व माहिती संकलनाची पद्धत यासंदर्भात विभागीय आयुक्त श्रीमती विजयलक्ष्मी बिदरी यांनी माहिती दिली. ही माहिती डॅशबोर्डवर सुद्धा उपलब्ध असल्यामुळे महसूल कृषी या विभागासोबतच प्रत्यक्ष शेतकरीसुद्धा आपली माहिती अपलोड करू शकतो. हा प्रयोग प्रायोगिक तत्वावर नागपूर विभागात राबविण्यात येत असून डेटाबेस व्यवस्थापनाच्या माध्यमातून अचूक माहिती उपलब्ध होऊ शकते असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Advertisements

प्रारंभी नागपूर विभागातील जिल्हा नियोजन समितीची रचना, त्याअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना, तसेच योजना तयार करतांना उपलब्ध होत असलेली सांख्यिकीय माहिती, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनामध्ये डेटा बेसचा आधार याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
विभागीय आयुक्त श्रीमती बिदरी यांनी जागतिक बँकेच्या प्रतिनिधींचे स्वागत केले. प्रास्ताविक नियोजन विभागाचे उपायुक्त धनंजय सुटे यांनी केले. बैठकीस विभागाचे सर्व जिल्हा नियोजन अधिकारी उपस्थित होते.