हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

डिजीटल रामायण तरुणांना आकर्षित करेल! ◆ केंद्रीय मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांना विश्वास

spot_img

डिजीटल रामायण तरुणांना आकर्षित करेल!

◆ केंद्रीय मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांना विश्वास

नागपूर – आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून निर्माण झालेले डिजिटल रामायण लोक मनापासून स्वीकारतील. यातील विवेचन विशेषत्वाने तरुणांना आकर्षित करेल आणि त्यांच्यात रामायणाबद्दल ओढ निर्माण होईल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

Advertisements

‘सेफ शॉप डायरेक्ट दिल से’ या समूहाच्या वतीने आयोजित डिजिटल रामायणाच्या प्रकाशन सोहळ्याला ना. श्री. नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती. पर्सिस्टंट सभागृहात झालेल्या या सोहळ्याला डीएमपी प्रा. लिमिटेडचे संचालक योगेश वाधवा, प्रा. गिरीश देशमुख, संजय जैन, जीवन मगर, विवेक सुरानी, कंवलजीत उपस्थित होते. प्रभू श्रीरामचंद्रांचे विचार प्रभावीपणे पोहचविणारे हे माध्यम ठरेल, असे गौरवोद्गारही ना. श्री. गडकरी यांनी काढले.

ते म्हणाले, ‘प्रभू रामचंद्रांना अहंकाराचे ज्ञान होते, तर रावणाला ज्ञानाचा अहंकार होता. प्रत्येकालाच आपला राजा, मुलगा, भाऊ रामासारखा हवा असतो. याच रामाच्या आयुष्यावर आधारित रामायण डिजिटल स्वरूपात यावे, ही बाब कौतुकास्पद आहे.’