हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

जिल्ह्यात तीन ठिकाणी दुहेरी तर एका ठिकाणी चौरंगी लढतीचे संकेत ◾️ अर्जुनी-मोरगाव, देवरी-आमगाव व तिरोडा-गोरेगावात युती-आघाडीला बंडखोरीचे ग्रहण

spot_img

जिल्ह्यात तीन ठिकाणी दुहेरी तर एका ठिकाणी चौरंगी लढतीचे संकेत

◾️ अर्जुनी-मोरगाव, देवरी-आमगाव व तिरोडा-गोरेगावात युती-आघाडीला बंडखोरीचे ग्रहण

गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेकांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला असला तरी अर्जुनी-मोरगाव, देवरी-आमगाव व तिरोडा-गोरेगाव मतदारसंघात मात्र, युती-आघाडीला बंडखोरीचा सामना करावा लागणार आहे. त्यातच अर्जुनी-मोरगावात विद्यमान आमदारांनी राष्ट्रवादीला राम राम करून प्रहारच्या तिकीटावर त्यांचे सुपुत्र निवडणूक लढवत आहेत.

Advertisements
Oplus_131072

त्यामुळे या मतदारसंघात युती-आघाडीसह प्रहार व बंडखोर अशी चौरंगी लढत पहावयास मिळणार आहे. तर जिल्ह्यातील इतर तीन मतदारसंघात काही प्रमाणात अपक्ष उमेदवार आपला जोर दाखविण्याच्या तयारीत आहेत असे असताना तिन्ही ठिकाणी दुहेरी लढतीचे संकेत दिसून येत आहेत.

Oplus_131072

गोंदिया जिल्ह्यात गोंदिया, तिरोडा-गोरेगाव, अर्जुनी-मोरगाव, देवरी-आमगाव असे चार विधानसभा मतदारसंघ आहेत. दरम्यान, या चारही मतदारसंघात युती-आघाडीत बंडखोरी झाल्याचे पहावयास मिळत आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रामध्ये सर्वाधिक बंडखोरी झाली असून या मतदारसंघात महायुतीतून राष्ट्रवादीचे उमेदवार राजकुमार बडोले, महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे दिलीप बनसोड, यांच्यात लढत होणार आहे.

Oplus_131072

असे असले तरी ऐन वेळेवर तिकीट कापण्यात आल्याने राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार मनोहर चंद्रिकापूरे यांनी पक्षातून बाहेर पडत बच्चू कडू यांच्या प्रहार बॅनरखाली वेगळी चूल मांडली असून त्यांचे सुपुत्र सुगत चंद्रिकापूरे प्रहारच्या तिकीटावर निवडणूक लढवित आहेत. तर दुसरीकडे तिकीट न मिळाल्याने नाराज झालेले काँग्रेसचे बंडखोर अजय लांजेवार व भाजपाचे बंडखोर रत्नदीप दहिवले यांनीदेखील आपला नामांकनपत्र कायम ठेवत निवडणूकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे या मतदारसंघात चौरंगी लढत रंगणार आहे. तेव्हा या मतदारसंघाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष राहणार आहे.

Advertisements
Oplus_131072

त्यातच, तिरोडा-गोरेगाव विधानसभा क्षेत्राकडे लक्ष दिल्यास या मतदारसंघात भाजपाचे विजय रांहागडाले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे रविकांत उर्फ गुड्डू बोपचे यांच्यामध्ये दुहेरी लढत होईल. मात्र, या मतदारसंघातही आघाडीला बंडखोरीचा सामना करावा लागणार असतानाच वंचितचा जोरही दिसणार असून वंचिततर्फे अतुल गजभिये यांना उमेदवारी देण्यात आली असून कॉंग्रेसच्या बंडखोर वनिता ठाकरे यादेखील रिंगणात आहेत. तर गोंदिया विधानसभेत कॉंग्रेसमध्ये बंडखोरीचे चित्र असताना पक्षश्रेष्टींकडून त्यांची मनधरणी करण्यात आदी असल्याने भाजपाचे विनोद अग्रवाल आणि काँग्रेसचे गोपालदास अग्रवाल यांच्यामध्ये दुहेरी लढत होणार आहे.

दुसरीकडे देवरी-आमगाव विधानसभा मतदारसंघात महायुतीत बंडखोरी करण्यात आली असून भाजपचे शंकर मडावी हे अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. असे असले तरी या ठिकाणी भाजपाचे संजय पुराम आणि काँग्रेसचे राजकुमार पुराम यांच्यामध्येच मुख्य लढत होणार असल्याचे चित्र दिसत आहे.
०००००००००