हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

जहाल नक्षलवादी देवाचे गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण ◼️सात लाख रुपयांचे होते बक्षीस

spot_img

जहाल नक्षलवादी देवाचे गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण

◼️सात लाख रुपयांचे होते बक्षीस

गोंदिया : 7 लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या जहाल माओवाद्याने गुरुवार (ता. 26) नक्षल चळवळीचा त्याग करून गोंदियाचे जिल्हाधिकारी प्रजित नायर, जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांचेसमक्ष आत्मसमर्पण केले. देवा उर्फ अर्जुन उर्फ राकेश सुमडो मुडाम (वय 27 वर्ष, रा. गुंडम सुटबाईपारा, पोस्ट- बासागुडा, ता. ऊसुर, पोलीस ठाणे पामेड, जि. बिजापुर (छ.ग.) (सदस्य तांडा दलम, मलाजखंड दलम, पामेड प्लाटून- 9/ प्लाटून पार्टी कमिटी मेंबर) असे आत्मसमर्पण करणाऱ्या माओवाद्याचे नाव आहे.

Advertisements

देशातील माओवादी चळवळीला प्रतिबंध व्हावा व अधिकाधिक माओवाद्यांनी आत्मसमर्पण करुन त्यांनी विकासाच्या मुख्य प्रवाहात यावे, त्यांचे सामाजिक व आर्थीक पुनर्वसन व्हावे या उद्देशाने महाराष्ट्र शासनामार्फत नक्षल आत्मसमर्पण योजना राबविली जात आहे. दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक, नित्यानंद झा यांच्या मार्गदर्शनाखाली माओवादी चळवळीचे समूळ उच्चाटन करण्याकरीता गोंदिया जिल्ह्यात प्रभावी नक्षलविरोधी अभियान राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने विविध उपक्रम राबवून शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती जनतेला/नागरीकांना देऊन जनजागृती करण्यात येत आहे. तसेच जे माओवादी विविध भूलथापा व प्रलोभनांना बळी पडून माओवादी संघटनेत भरती झाले, त्यांना हिंसेचा मार्ग सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट होण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात आलेल्या आवाहनाला प्रभावित होत आणि माओवादी संघटनेत होणारा त्रास व अत्याचारास कंटाळून 7 लाखाचे बक्षिस असलेल्या जहाल माओवादी प्लाटून पार्टी कमिटी मेंबर देवा उर्फ अर्जुन उर्फ राकेश सुमडो मुडाम याने गुरुवार 26 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांच्यासमक्ष आत्मसमर्पण केले.

माओवाद्याचे आत्मसमर्पण घडवून त्याला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याबाबतची कार्यवाही नक्षल विरोधी अभियान नागपूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उप- महानिरीक्षक अंकीत गोयल, गोंदियाचे जिल्हाधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

◼️बालवयापासूनच नक्षल चळवळीत सहभाग..

Advertisements

आत्मसमर्पित माओवादी देवा याचे मुळ गाव बिजापुर जिल्ह्यातील अति नक्षल प्रभावित भागात असल्याने त्याचे गावात पुर्वी पासुनच सशस्त्र गणवेषधारी माओवाद्यांचे येणे जाणे होते. माओवाद्यांच्या भुलथापा व प्रलोभनांना बळी पडुन त्यांच्या निर्देशाप्रमाणे लहानपणापासुनच तो नक्षल चळवळीत सहभागी होवुन बाल संघटनमध्ये काम करीत होता. त्यानंतर सन- 2014 मध्ये तो पामेड दलम (दक्षीण बस्तर), जि. बिजापुर मध्ये भरती झाला व शस्त्र हातात घेतले. पामेड दलम मध्ये 6 महिने काम केल्यानंतर सन- 2014 चे अखेरीस त्याने अबुझमाड एरीया मध्ये अडीच महिन्याचे प्रशिक्षण घेतले, प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यास सन 2015 मध्ये माओवाद्यांचे बस्तर एरीया मधुन एम. एस. सी. (महाराष्ट्र- मध्यप्रदेश -छत्तीसगड) झोन कडे पाठविण्यात आले. एम.एम.सी. मध्ये येवून सुरुवातीला त्याने दलम सदस्य म्हणून सन 2015 ते 2016 पर्यंत तांडा दलम व सन 2016 ते 2017 पर्यंत मलाजखंड दलम मध्ये काम केले. त्यादरम्यान मलाजखंड एरीयाचा डि.व्ही.सी.एम. चंदु ऊर्फ देवचंद याचा अंगरक्षक म्हणून काम केले. सन- 2018 मध्ये त्यास परत दक्षीण बस्तर एरीया मध्ये पाठविण्यात आले. सन 2018 ते सप्टेंबर 2019 पर्यंत (माओवादी संघटना सोडण्यापर्यंत) त्याने पामेड प्लाटून क्रं. 9 मध्ये प्लाटून दलम सदस्य म्हणून काम केले.

◼️या कारवायांमध्ये होता सहभागी…

आत्मसमर्पीत माओवादी देवा हा सन 2014 ते 2019 नक्षल संघटनेत कार्यरत असताना टिपागड फायरींग (जिल्हा गडचिरोली), झिलमिली काशीबहरा बकरकट्टा फायरींग (जि. राजनांदगाव, छ.ग.), झिलमिली / मलैदा फॉरेस्ट कर्मचारी यांना मारहाण व चौकी जाळपोळ (जि. राजनांदगाव, छ.ग.), हत्तीगुडा / घोडापाठ फायरींग (जि. राजनांदगाव, छ.ग.), किस्टाराम ब्लास्ट (जि. सुकमा, छ.ग.), पामेड फायरींग (जि. बिजापुर, छ.ग.) इ. गुन्हयात सहभागी असल्याची माहिती दिली आहे.

Advertisements

◼️हिंसेचा मार्ग त्यागून समाजाच्या मुख्य प्रवाहात या

“विकास कामांना आडकाठी निर्माण करणाऱ्या माओवाद्यांवर गोंदिया पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास समर्थ असून जे माओवादी हिंसेचा मार्ग त्यागून समाजाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ठ होण्यास ईच्छुक असतील त्यांना आत्मसमर्पण करुन शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देवून त्यांचे जिवन सुकर करण्यास व त्यांना सन्मानाने जिवन जगण्यास गोंदिया पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल” असे आवाहन गोंदिया पोलीस प्रशासनाकडूनकरण्यात आले आहे.