हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

जनता दल सेक्युलर पक्षाचे नेते समाजवादी पक्षात -प्रताप होगाड़े

spot_img

जनता दल सेक्युलर पक्षाचे नेते समाजवादी पक्षात -प्रताप होगाड़े

जनता दल सेक्यूलर अध्यक्ष देवेगौड़ा यांनी भाजपा सोबत युति केल्याने महाराष्ट्र जनता दल सेक्यूलर नेत्यांना ते मान्य नसल्याने राज्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी यांनी अबु आझमी यांच्या नेतृत्वात समाजवादी पार्टीत् प्रवेश केल्याची माहिती प्रताप होगाड़े यांनी दिली.

समाजवादी पार्टी, महाराष्ट्र
नवीन नियुक्ती करण्यात आलेले पदाधिकारी खलील प्रणाने..!

Advertisements

श्री. प्रताप होगाडे (जिला : कोल्हापूर) – महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष – 09823072249

एड. रेवण भोसले (जिला : उस्मानाबाद) – महाराष्ट्र प्रदेश महासचिव तथा महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता – 09422069551

डॉ. पी. डी. जोशी पाटोदेकर (जिला : नांदेड) – महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष – 09422171778

Advertisements

डॉ. विलास सुरकर (जिला : नागपूर) – महाराष्ट्र प्रदेश महासचिव – 09822228187

श्रीमती साजिदा निहाल अहमद – महाराष्ट्र प्रदेश महासचिव तथा महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक सेल अध्यक्ष – 07020027161

श्री. शिवाजीराव परुळेकर (जिला : कोल्हापूर) – महाराष्ट्र प्रदेश महासचिव तथा महाराष्ट्र प्रदेश किसान संघटन प्रमुख – 08087232410

Advertisements

एड. नंदेश अंबाडकर (जिला : अमरावती) – महाराष्ट्र प्रदेश सचिव – 09011676954

श्री. कुमार राऊत (जिला : वसई विरार) – महाराष्ट्र प्रदेश सचिव – 09422659245

श्री. मुस्तकीन डिग्निटी, मालेगांव (जिला : नाशिक) युवजनसभा महाराष्ट्र प्रदेश महासचिव

वरीलप्रमाणे पदाधिकारी नियुक्ती केल्याचे समाजवादी पार्टी, महाराष्ट्र पक्षाचे वतीने जाहीर करण्यात आले आहे.

मुंबई अबू असिम आझमी
दि. 8 नोव्हेंबर 2023 प्रदेश अध्यक्ष, समाजवादी पार्टी, महाराष्ट्र व मुंबई

जनता दल (सेक्युलर) महाराष्ट्र
(भूतपूर्व पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष व कार्यकर्ते, महाराष्ट्र राज्य)
___________________________________________________________________________
कृपया प्रसिद्धीसाठी – दि. ८ नोव्हेंबर २०२३
समाजवादी पक्षात प्रवेश करण्यामागील भूमिका, माहिती व पार्श्वभूमी

जनता दल (सेक्युलर) महाराष्ट्र राज्य कार्यकारीणी, जिल्हाध्यक्ष व निमंत्रित
यांची बैठक दि. ३०/०९/२०२३

पुणे येथे झालेल्या या बैठकीस राज्यातील 20 जिल्ह्यातील अध्यक्ष व निमंत्रित यांचेसह एकूण 80 कार्यकारीणी सदस्य उपस्थित होते. या बैठकीत खालीलप्रमाणे निर्णय एकमताने घेण्यात आले.

●राज्य पक्षाची भूमिका व ठराव●

एच. डी. कुमारस्वामी यांनी जनता दल सेक्युलर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष एच. डी. देवेगौडा यांच्या मान्यतेने दिल्ली येथे अमित शहा व जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत भाजपाशी युती करण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे. तथापि भाजपाशी युती ही भूमिका महाराष्ट्रातील बहुतांशी सर्व जनता दल सेक्युलर कार्यकर्त्यांना मान्य नाही. याबाबतचा तीव्र असंतोष या बैठकीत सर्वांनी व्यक्त केला आहे. या निर्णयाचा महाराष्ट्र जनता दल सेक्युलर ठाम विरोध करीत आहे व तीव्र निषेध व्यक्त करीत आहे.

महाराष्ट्रातील बहुतांशी कार्यकर्ते राष्ट्र सेवा दल व समाजवादी पक्ष या विचारसरणीमधून आलेले आहेत. महाराष्ट्र प्रदेश जनता दलाला मा. साने गुरुजी, साथी एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे, बॅ. नाथ पै, मधू दंडवते, प्रमिला दंडवते, बापूसाहेब काळदाते, मृणाल गोरे, निहाल अहमद, मधू लिमये, जॉर्ज फर्नांडिस अशा अनेक नेत्यांच्या विचारांचा संपन्न वारसा आहे. राज्यातील बहुतांशी सर्व कार्यकर्ते याच विचारसरणीचे व धर्मनिरपेक्ष व विज्ञाननिष्ठ विचारधारेचे आहेत. महाराष्ट्रातील आणि देशातील संविधान विरोधी, लोकशाही व जनहित विरोधी, मनुवादी फॅसिझमच्या पुरस्कर्त्या धर्मांध व जातीयवादी भाजपा संघ प्रणीत राजकारणाचा, राज्य आणि केंद्र सरकारचा व अशा सर्व प्रवृत्तिंचा विरोध करणे आणि समताधिष्ठित समाजवादी समाजरचनेसाठी सातत्याने जन आंदोलने करणे व जनतेच्या जिव्हाळ्याच्या मूलभूत प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी लोकलढे करणे ही जनता दल (सेक्युलर) महाराष्ट्र पक्षाची व कार्यकर्त्यांची भूमिका प्रथमपासूनच होती, आजही तीच आहे आणि पुढेही तीच कायम राहील. आजही त्याच भूमिकेतून महाराष्ट्र जनता दलाची ही सभा देवेगौडा यांच्या भाजपाशी युती करण्याच्या निर्णयाचा पूर्णपणे विरोध व निषेध करीत आहे व महाराष्ट्र जनता दल अशा कोणत्याही युतीत वा निर्णयात कोणत्याही परिस्थितीत कदापिही सहभागी होणार नाही अशी स्पष्ट व ठाम भूमिका जाहीर करीत आहे.

जनता दल सेक्युलर या पक्षाच्या घटनेमध्येच स्पष्टपणे या देशाचे संविधान, लोकशाही, धर्मनिरपेक्षता, समाजवाद व वैज्ञानिक दृष्टीकोन याप्रती निष्ठा आणि त्यासाठी आवश्यक तेथे म. गांधीजींच्या अहिंसा व सत्याग्रह या मार्गाने विरोध, हे संकल्प अंतर्भूत आहेत. असे स्पष्ट असतानाही भाजपाशी युतीचा राष्ट्रीय नेतृत्वाचा निर्णय हाच पक्षाच्या घटनेच्या विरोधी आहे. त्यामुळेच कर्नाटकात प्रचंड मोठ्या प्रमाणात राजीनामा सत्र सुरु झालेले आहे. केरळमधील जनता दलाने डाव्या पक्षांच्या आघाडीबरोबरच केरळ सरकारमध्ये राहण्याचा ठाम निर्णय जाहीर केलेला आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात या राज्यातील पक्ष संघटनांनी देवेगौडा यांच्या या भूमिकेला स्पष्ट विरोध केला आहे. आणखी कांही अन्य राज्यांतील पक्ष संघटनाही त्याच मार्गावर आहेत. देवेगौडा यांच्या भाजपाशी युती या भूमिकेच्या विरोधात देशातील जनता दलाच्या विविध राज्य संघटनांनी राष्ट्रीय पातळीवर सामूहिक विचारविनिमय सुरु केलेला आहे.

देवेगौडा यांनी जाहीर केलेली युती ही लोकसभा निवडणूकीसाठीची राष्ट्रीय पातळीवरील आघाडी आहे व ते अधिकृतरीत्या एनडीए मध्ये सहभागी झालेले आहेत. त्याचे गंभीर परिणाम सर्व राज्यांतील धर्मनिरपेक्ष जनता दल संघटना, कार्यकर्ते व मतदारांवर होणार आहेत. या सर्व वस्तुस्थितीचा विचार करता महाराष्ट्र प्रदेश जनता दल पक्ष संघटनेला राष्ट्रीय पक्ष नेत्यांशी व पक्षाशी संबंध तोडणे अपरिहार्य झालेले आहे. राज्यातील सर्व पक्ष कार्यकर्त्यांची पुढील वाटचाल एकत्रित व एकसंध व्हावी यासाठी अन्य समविचारी पक्षांपैकी योग्य पर्याय शोधणे व निश्चित करणे आवश्यक आहे. राज्यातील विविध प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी यासंदर्भात या बैठकीत विचार मांडले आहेत व समान विचारसरणी असलेले राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पक्ष व तत्सम पर्याय सुचविले आहेत. तथापि त्यासंदर्भात सदर पक्षांचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्यस्तरीय नेते यांच्याशी समक्ष साधकबाधक चर्चा करणे व त्यानंतर अंतिम निर्णय करणे आवश्यक आहे.

अशी चर्चा करण्यासाठी व अंतिम निर्णय घेण्यासाठी पुढीलप्रमाणे प्रमुख पदाधिकारी यांची समिती निश्चित करण्यात येत आहे. १. प्रताप होगाडे २. श्रीमती साजिदा निहाल अहमद ३. डॉ. पी. डी. जोशी पाटोदेकर ४. अ‍ॅड. रेवण भोसले ५. डॉ. विलास सुरकर ६. विठ्ठल सातव ७. शिवाजी परुळेकर ८. चंद्रशेखर रानडे. या समितीने आवश्यक वाटतील त्या सर्व पक्षनेत्यांशी व संबंधितांशी चर्चा करणे, योग्य पर्याय निश्चित करणे व त्यासाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही करणे हे संपूर्ण अधिकार ही सभा या समितीला एकमताने देत आहे. समिती जो निर्णय घेईल, त्यामध्ये सहभागी होण्याचा व पुढील वाटचाल करण्याचा निर्णय ही सभा एकमताने करीत आहे.

जनता दल (सेक्युलर) महाराष्ट्र – राज्य पदाधिकारी
बैठक दि. २०/१०/२०२३

या बैठकीत मागील संपूर्ण कालावधीत घडलेल्या विविध घटना, झालेल्या विविध बैठका, चर्चा इ. सर्व माहिती देण्यात आली. त्यानंतर एकमताने समाजवादी पार्टी या पक्षात सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला. पक्षाचे प्रदेश अध्यक्ष मा. अबू असीम आझमी यांच्यासह पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. अखिलेशजी यादव यांची समक्ष भेट घ्यावी असाही निर्णय घेण्यात आला.

मा. अखिलेशजी यादव यांच्यासह बैठक दि. ३० ऑक्टोबर २०२३

या निर्णयानुसार समाजवादी पार्टीचे प्रदेश अध्यक्ष मा. अबू असीम आझमी यांच्यासह राष्ट्रीय अध्यक्ष मा. अखिलेशजी यादव यांच्याशी लखनौ येथे दि. 30 ऑक्टोबर रोजी बैठक झाली. राज्यातील जनता दलाचे प्रमुख 10 पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी अत्यंत समाधानकारक व सकारात्मक स्वरुपाची चर्चा झाली. या चर्चेनंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये मा. अखिलेश यादव व मा. अबू आझमी यांनी उपस्थित सर्व पदाधिकारी यांचे अभिनंदन व पक्षात स्वागत केले. या बैठकीतील निर्णयानुसार आम्ही महाराष्ट्रातील 70% पदाधिकारी व कार्यकर्ते समाजवादी पार्टी या पक्षामध्ये सहभागी झालो आहोत व प्रत्यक्ष कामकाज सुरु करीत आहोत. त्याचबरोबर नजीकच्या काळात राज्यातील किमान 90% पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच अन्य अनेक समविचारी समाजवादी कार्यकर्ते समाजवादी पार्टीमध्ये सहभागी होतील असा विश्वास आम्ही आज व्यक्त करीत आहोत…

समाजवादी पक्षात सहभागी होणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने,
प्रताप होगाडे, अ‍ॅड. रेवण भोसले, डॉ. पी. डी. जोशी पाटोदेकर, श्रीमती साजिदा निहाल अहमद, डॉ. विलास सुरकर, मनवेल तुस्कानो (भूतपूर्व राज्य पदाधिकारी)
मुंबई दि. ८ नोव्हेंबर २०२३