हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

घरफोड्या करणारा अट्टल चोरटा मुद्देमालासह जेरबंद ◼️माजी आमदार दिलीप बनसोड यांच्या घरी केली होती चोरी ◾️स्थानिक गुन्हे शाखा व तिरोडा पोलिसांची कारवाई ◾️ 21 लाख रुपयांचा मुद्येमाल हस्तगत

spot_img

घरफोड्या करणारा अट्टल चोरटा मुद्देमालासह जेरबंद

◼️माजी आमदार दिलीप बनसोड यांच्या घरी केली होती चोरी

◾️स्थानिक गुन्हे शाखा व तिरोडा पोलिसांची कारवाई

Advertisements

◾️ 21 लाख रुपयांचा मुद्येमाल हस्तगत

गोंदिया : तिरोडा येथील माजी आमदार दिलीप बनसोड यांच्या घरातून 18.47 लाख रुपयांची चोरी करणार्‍या अट्टल व मुख्य चोरट्याला अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखा व तिरोडा पोलिसांना यश आले आहे. दरम्यान, पोलिसांनी चोरट्यांनी 21 लाख रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करून जप्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 7 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री 8 ते रात्री 10 वाजता चे सुमारास माजी आमदार दिलीप बनसोड यांचे राहते घरी कोणीही हजर नसतांना कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी घरातून सोन्याचे दागिने व नगदी असा 18 लाख 47 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरी केल्याचे बनसोड यांचे चालक फिर्यादी सोमप्रकाश फुलचंद बीसेन (वय 42 रा. मेंढा, ता. तिरोडा) यांच्या तक्रारीवरून तिरोडा पोलिसांनी अपराध क्रमांक 827/2024 कलम 331(4), 305 (अ) भा. न्याय संहिता- 2023 अन्वये 8 नोव्हेंबर 2024 रोजी गुन्हा करून वरिष्ठांनी दिलेल्या निर्देश सूचनाप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी साहिल झरकर यांचे मार्गदर्शनात स्था.गु.शा. गोंदियाचे पोलीस निरीक्षक दिनेश लबडे तसेच तिरोडाचे पोलीस निरीक्षक अमित वानखेडे यांचे नेतृत्वात घरफोडी करणाऱ्या गुन्हेगारांचे शोध व आरोपीतांना जेरबंद करण्याकरीता वेगवेगळी पथके नेमण्यात आलेली होती. स्था.गु.शा. व तिरोडा पथकातील पोलीस अधिकारी – अंमलदार अज्ञात चोरटे आरोपीतांचा शोध घेत असताना घटनास्थळ वरून प्राप्त सीसीटीव्ही फुटेज तसेच गोपनिय माहितीच्या आधारे 10 नोव्हेंबर रोजी संशयावरून आरोपी रामन्ना उर्फ रामचंद्र पोचन्ना ठाकरे (वय 35 वर्षे रा. देसाईगंज/वडसा) यास ताब्यात घेवुन जेरबंद कऱण्यात आले होते.

Advertisements

गुन्ह्याचे अनुषंगाने त्यास सखोल चौकशी विचारपूस केली असता त्याने घरफोडी करणारा मुख्य सूत्रधार अट्टल चोरटा आरोपी विष्णू खोकण विश्वास (वय 34 वर्षे रा. अरुण नगर, ता. अर्जुनी मोरगाव असे असल्याचे सांगितले. या आधारे पोलीस पथकाकडून मुख्य सूत्रधार अट्टल आरोपीचा साधारण मागील एक महिन्यापासून गोंदिया जिल्ह्यासह भंडारा, नागपूर जिल्हा तसेच तेलंगणा, छत्तीसगड राज्यात शोध घेवून अखेर मुख्य चोरटा आरोपी विष्णु विश्वास यास देसाईगंज/ वडसा येथून ताब्यात घेऊन जेरबंद करण्यात आले. गुन्ह्याचे अनुषंगाने त्यास केलेली विचारपूस तपास चौकशी दरम्यान गुन्हा केल्याचे कबुल केले. दरम्यान, पोलिसांनी आरोपीचे ताब्यातून 4 नग सोन्याचे बिस्कीट एक जुनी वापरती पल्सर गाडी तर यापूर्वी अटक केलेल्या आरोपी पासून नगदी 24 हजार 500 रूपये असा साधारण 21 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन जप्त करण्यात आले आहे.

◾️इतर गुन्ह्यात सहभाग असल्याची शंका…
अटक करण्यात आलेल्या चोरट्यांचा इतर गुन्ह्यातही सहभाग असल्याच्या संशयावरून जिल्ह्यातील इतरत्र घरफोडीचे गुन्हे तसेच नमूद गुन्ह्याचे अनुषंगाने आरोपी यास सखोल विचारपूस चौकशी करण्यात येत आहे. गुन्ह्याचा अधिकचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक मसराम करीत आहेत.
०००००००