गोरेगाव तालुका पत्रकार संघातर्फे पत्रकार भवनासाठी भूखंडाची मागणी
गोंदिया : शासन मान्यताप्राप्त व नोंदणीकृत गोरेगाव तालुका पत्रकार संघ नोंदणी क्रमांक ७७७ गोरेगाव येथील गट क्रमांक ५६१, १.५० हेक्टर जमीन शासकीय भावाने देण्याची मागणी करणारे निवेदन गोरेगाव तहसीलदारांना दिले आहे.
आर. प्लॉट क्रमांक 41, क्षेत्रफळ 1500 चौरस फूट किमत देण्यास सरकार तयार आहे. पत्रकार संघ गेल्या दहा वर्षांपासून ही मागणी करत आहे, मात्र प्रशासनाने त्याकडे लक्ष दिलेले नाही. त्यामुळे तातडीने भूखंड वाटप करण्याची मागणी केली आहे. यावेळी गोरेगाव तालुका पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष रणजित सरोजकर यांच्या नेतृत्वाखाली दिलेल्या निवेदनाच्या वेळी सचिव डिलेश्वर पंधराम, कोषाध्यक्ष प्रमोद नागनाथे, हौसलाल रहांगडाले, खेमेंद्र कटरे, मनोज सरोजकर व भूमेश्वर धमगाये आदी उपस्थित होते.