हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

गोरेगावात अवैध रुग्णालयावर छापा ◼️बोगस डॉक्टर पोलिसांच्या ताब्यात ◼️विना रजिस्ट्रेशन करायचा रुग्णांवर उपचार

spot_img

गोरेगावात अवैध रुग्णालयावर छापा

◼️बोगस डॉक्टर पोलिसांच्या ताब्यात

◼️विना रजिस्ट्रेशन करायचा रुग्णांवर उपचार

Advertisements

गोंदिया : शासकीय मान्यताप्राप्त कुठलाही वैद्यकीय परवाना नसताना रुग्णालय सुरू करुन रुग्णांवर उपचार करणार्‍या बोगस डॉक्टराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. डॉ.नितेश बाजपेयी असे त्या बोगस डॉक्टरांचे नाव आहे.

जिल्हा शल्य चिकित्सक यांना गोरेगाव येथे एक बोगस डॉक्टर त्याचेकडे कुठलेही शासन मान्यता प्राप्त वैद्यकीय परवाना नसताना (विना रजिस्ट्रेशन) हॉस्पिटल चालवत आहे. अशी खात्रीशीर माहिती प्राप्त झाले वरून जिल्हा शल्य चिकित्सक गोंदिया यांनी सदर ची माहिती पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, यांना देवुन कारवाई करण्याकरिता मदत करण्याची विनंती केली होती.

पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांचे टीम ला कारवाई करण्याकरिता मदत करण्याचे तसेच बोगस डॉक्टर संबंधात खात्री करून कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस निरीक्षक , पोलीस ठाणे गोरेगाव यांना दिले होते. त्यानुसार पोलीस अधीक्षक यांचे निर्देशाप्रमाणे जिल्हा शल्य चिकित्सक यांचे चमू सोबत गोरेगाव पोलीस पथकास रवाना करण्यात आले. जिल्हा शल्य चिकित्सक व वैद्यकीय अधीक्षक गोरेगाव, यांचे सह पोलीस पथक गोरेगाव येथील डॉ. नितेश बाजपेयी यांचे हॉस्पिटल येथे पोहचून त्यांना आपली ओळख देवुन त्यांच्या दवाखाना रजिस्ट्रेशन परवाना बाबत विचारले असता, सदर ठिकाणी असलेल्या नर्स स्टाफ कडून कोणत्याही प्रकारचा रजिस्ट्रेशन परवाना नसल्याबाबत सांगून उडवाउडवीची उत्तर देण्यात आली.

Advertisements

विशेष म्हणजे, हॉस्पिटल मध्ये एक महिला ऍडमिट असून तिच्यावर विना पात्रता धारक डॉक्टर द्वारे औषधोपचार सुरू होते. तसेच हॉस्पिटल बाबत कोणतेही प्रकारचे रजिस्ट्रेशन झाले नसल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक, गोंदिया यांनी सांगितले. वैद्यकीय अधीक्षक,गोरेगाव डॉ. विजय पटले यांनी दोन शासकीय पंचा समक्ष सदर ठिकाणी रीतसर कायदेशीर कारवाई केली. सदरचे हॉस्पिटल व त्यातील डॉक्टर बोगस असल्याने वैद्यकीय अधीक्षक, गोरेगाव डॉ.पटले यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन गोरेगाव येथे अप क्र- 130/2024 Maharashtra Medical Practitioners Act, 1961, 33(2) B कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक भुसारी, यांच्या मार्गदर्शनात पोउपनि- सुजित घोलप करीत आहेत.