हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

गोरेगावच्या काजलची युपीएससीत भरारी ◼️चर्मकार समाजातून जिल्ह्यातील पहिली विद्यार्थिनी

spot_img

गोरेगावच्या काजलची युपीएससीत भरारी

◼️चर्मकार समाजातून जिल्ह्यातील पहिली विद्यार्थिनी

गोंदिया, : जिल्ह्यातील गोरेगाव येथील काजल आनंद चव्हाण या विद्यार्थिनीने युपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली असून तीने या परिक्षेत ७५३ वी रँक प्राप्त केली आहे. विशेष म्हणजे, काजल ही गोंदिया जिल्ह्य़ातून चर्मकार समाजातील युपीएससी उत्तीर्ण करणारी पहिली विद्यार्थीनी आहे.

Advertisements

काजलचे वडील व्यवसायिक असून आजोबा बी.टी. चव्हाण हे सेवा निवृत्त केंद्र प्रमुख तर मोठे वडील कमल चव्हाण हे सडक अर्जुनी तालुक्यातील शेंडा येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेत पदवीधर शिक्षक आहेत. काजल ही प्रशासकीय सेवेत जावे ही तिच्या आजोबांची इच्छा आहे. त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी काजलने अथक परिश्रम घेत पहिल्याच प्रयत्नात हे यश प्राप्त केले आहे. तर काजलचा लहान भाऊ नेहाल हा इंजिनियर असून तो देखील युपीएससीची तयारी करीत आहे. तिचे १० वी पर्यंतचे शिक्षण गोंदियाच्या एका खासगी शाळेत झाल्यानंतर तिने ११ वी व १२ वी पर्यंतचे शिक्षण गोरेगाव येथील शहिद जान्या तिम्या जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालयातून केले.

यानंतर गोरेगावच्या जगत महाविद्यालयात विज्ञान व कला शाखेत पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून दिल्ली येथे यूपीएससीची पुर्वपरिक्षेची तयारी केली. व ऑनलाइन अभ्यास करून युपीएससी उत्तीर्ण करणारी चर्मकार समाजातून गोंदिया जिल्ह्यातील पहिली विद्यार्थीनी ठरली असल्याचे व ही परिक्षा उत्तीर्ण करण्यात जगत महाविद्यालयाचे प्राचार्य व प्राध्यापक वर्ग यांनी तिला विशेष मार्गदर्शन केल्याचे काजलचे मोठे बाबा कमल चव्हाण यांनी दै. पुढारीला सांगितले. काजलने युपीएससी परिक्षा उत्तीर्ण करून ७५३ वी प्राप्त केल्याने गोरेगाव शहरासह संपूर्ण तालुकावासियांकडून व समाज बांधवांतर्फे तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.