हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

गोंदिया जिल्ह्यात लाडक्या बहिणीचा जादू ! ◾️ चारही मतदारसंघात महायुतीचा ‘विजयʼ ◾️गोंदियात पहिल्यांदाच फुलले कमळ, तिरोड्यात हॅट्ट्रिक,आमगावात पुराम तर अर्जुनी मोरगावात बडोलेंची घड्याळ चालली

spot_img

गोंदिया जिल्ह्यात लाडक्या बहिणीचा जादू !

◾️ चारही मतदारसंघात महायुतीचा ‘विजयʼ

◾️गोंदियात पहिल्यांदाच फुलले कमळ, तिरोड्यात हॅट्ट्रिक,आमगावात पुराम तर अर्जुनी मोरगावात बडोलेंची घड्याळ चालली

Advertisements

गोंदिया: गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा, गोंदिया, आमगाव व अर्जुनी मोरगाव या चार ही विधानसभा मतदारसंघात आज, शनिवार (ता. २३) पार पडलेल्या मतमोजणीत महायुतीच्या उमेदवारांनी विजयश्री मिळवत भगवा झेंडा फडकवला. गोंदिया विधानसभेत कधी नव्हे असे पहिल्यांदाच विनोद अग्रवाल यांनी कमळ फुलवले. त्यातच तिरोडा-गोरेगाव मतदारसंघात भाजपचे विजय रहांगडाले यांनी विजयाची हॅट्ट्रिक केली. तर देवरीत संजय पुराम यांनी गेल्या निवडणुकीची भरपाई काढत विजय मिळवला. दुसरीकडे राजकुमार बडोले यांनी अजित पवारांची घडी बांधून विजयश्री खेचून आणली. एकंदरीत जिल्ह्यातील चारही मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांचा विजय झाला असून जिल्ह्यातही ‘लाडकी बहीण योजनाʼचा जादू चाललाच्या चर्चा जिल्ह्यात रंगू लागल्या आहेत.

२० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर युती-आघाडीसह सर्वच पक्षाचे उमेदवार व पदाधिकारी कार्यकर्त्यांचे आज, होणाऱ्या मतमोजणीकडे लक्ष लागून होते. दरम्यान, आपला उमेदवार कसा निवडून येणार याचे गणित प्रत्येक पक्षाचे पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांकडून मांडण्यात येत होता. मात्र, आज, आलेल्या निकालात अनेकांच्या भुवया उंचावल्या ६५- गोंदिया मतदारसंघात भाजपचे विनोद अग्रवाल व कॉंग्रेसचे गोपालदास अग्रवाल यांच्यात ‘काटे की टक्करʼ होणार असे वाटत असताना विनोद अग्रवाल यांनी १ लाख ४३ हजार १२ मत घेत काँग्रेसचे गोपालदास अग्रवाल (८१ हजार ४०४) यांचा ६१ हजार ६०८ मतांनी पराभव करून गोंदिया मतदारसंघात आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपला विजय मिळवून दिला. त्यातच ६४-तिरोडा-गोरेगाव मतदारसंघात भाजपचे विजय रहांगडाले व तुतारी शरद पवार गटाचे रविकांत बोपचे यांच्यात चुरशीची लढाई झाल्याचे चित्र असताना विजय रहांगडाले यांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बढत कायम ठेवत १ लाख २ हजार ९८४ मत घेत रविकांत बोपचे (६० हजार २९८) यांचा ४२ हजार ६८६ मतांनी पराभव करून विजयाची हॅट्ट्रिक नोंदवली.

तर अनुसूचित जमाती करिता राखीव जिल्ह्यातील ६६-आमगाव-देवरी मतदारसंघात कॉंग्रेसमध्ये पक्षांतर्गत झालेला व ऐन वेळेवर आघाडीकडून काँग्रेसच्या तिकिटावर नवख्या उमेदवाराला देण्यात आलेली संधी पाहता या मतदारसंघात महायुतीच्या दृष्टीने अपेक्षित असाच निकाल लागला. येथील भाजपचे संजय पुराम यांनी १ लाख १० हजार १२३ मत घेत कॉंग्रेसचे राजकुमार पुराम (७७ हजार ४०३) यांचा ३२ हजार ७२१ मतांनी पराभव करत गेल्या २०१९ च्या निवडणुकीत झालेल्या पराभवाची भरपाई करून घेतली. त्यातच जिल्ह्यातील हायहोल्टेज मतदारसंघ म्हणून पाहण्यात येणाऱ्या ६३-अर्जुनी-मोरगाव मतदारसंघात सुरुवातीला चौरंगी व नंतर तिरंगी लढत होणार असे वाटत असताना या मतदारसंघात महायुतीचा ‘चेहरा आमचा चिन्ह तुमचाʼ हा फॉर्म्यूला यशस्वी ठरला. या मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री इंजि.राजकुमार बडोले यांना ऐन वेळेवर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून तिकीट जाहीर करून निवडणूक लढविण्यात आली होती. त्यात आघाडीतर्फे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिलीप बनसोड यांचे आव्हान त्याच्यापुढे होते. दुसरीकडे तिकीट न मिळाल्याने नाराज झालेले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार मनोहर चंद्रिकापूरे यांचे चिरंजीव सुगत चंद्रिकापुरे यांनीही प्रहार पक्षात प्रवेश करून महायुतीला धक्का देण्याचा प्रयत्न केला. मात्र, येथील मतदारांनी बडोलेंना पसंती दिली. राजकुमार बडोले यांनी ८२ हजार ५०६ मत घेत काँग्रेसचे दिलीप बनसोड (६६ हजार ९१) यांचा १६ हजार ४१५ मतांनी पराभव करत तिसऱ्यांदा विजय मिळवला. तर प्रहार पक्षाचे उमेदवार सुगत चंद्रिकापूरे यांना १५ हजार ४२८ मतांवरच समाधान मानावे लागले.

Advertisements

◾️गोंदियात भाजपने रचला इतिहास…

गोंदिया विधानसभा मतदारसंघाचा आतापर्यंतचा इतिहास पाहता या मतदारसंघात दोन पंचवार्षिक वगळता कॉंग्रेसचे पारडे जड दिसून आले आहे. दोन पंचवार्षिकमध्ये युतीतर्फे शिवसेना पक्षातील आमदार होते, गेल्या निवडणुकीतही विनोद अग्रवाल यांनी अपक्ष लढत भाजपचे गोपालदास अग्रवाल यांचा पराभव केला होता. त्यामुळे भाजपला या मतदारसंघात विजय संपादन करता आले नव्हते. मात्र. यंदाच्या निवडणुकीत विनोद अग्रवाल यांनी भाजपकडून लढत कॉंग्रेसचे गोपालदास अग्रवाल यांचा मोठ्या फरकाने पराभव करून इतिहास रचला.

◾️अर्जुनी-मोरगावातील प्रयोग यशस्वी…

Advertisements

जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव मतदारसंघात महायुतीत जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू असताना ‘चिन्ह तुमचा चेहरा आमचाʼ हा फॉर्म्यूला करत भाजपतर्फे दोनदा आमदार त्यापैकी एकदा मंत्री राहिलेले राजकुमार बडोले यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून तिकीट देण्यात आली होती. दरम्यान, बडोले यांच्या विजयाने महायुतीचा हा प्रयोग यशस्वी झाल्याचे दिसून आले.

◾️तिरोड्यात ‘विजयʼची हॅट्ट्रिक…

तिरोडा-गोरेगाव मतदारसंघात भाजपतर्फे विजय रहांगडाले यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे भाजपच्या गोटात काही प्रमाणात नाराजीचे सुर होते. तर महाविकास आघाडीकडून गेल्या निवडणुकीत पराभूत झालेले राष्ट्रवादी शरद पवार गटाचे रविकांत बोपचे यांना तिकीट देण्यात आली होती. त्यामुळे रविकांत बोपचे बरोबरी गाठत येथील लढत चुरशीची ठरणार असे चित्र होते. मात्र, विजय रहांगडाले यांनी राजकीय तज्ज्ञांचे मत खोटे ठरवत विजयाची हॅटट्रिक केली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निवडणूक प्रचारात जिल्ह्यात आले होते. त्यावेळी आम्ही त्यांना गोंदिया जिल्ह्यातील चारही जागा महायुतीला जिंकून देणार असे ठामपणे सांगितले होते. आणि आजच्या निकालात ते दिसून आले त्यामुळे आमचा आनंद गगनात मावेनासा झालेला आहे.

– अॅड. येशूलाल उपराडे, जिल्हाध्यक्ष, भाजपा, गोंदिया
०००००००००