हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

गोंदियात होर्डींगने घेतला एकाचा बळी ◼️होर्डिंग काढताना करंट लागून युवकाचा मृत्यू

spot_img

गोंदियात होर्डींगने घेतला एकाचा बळी

◼️होर्डिंग काढताना करंट लागून युवकाचा मृत्यू

गोंदिया : गेल्या महिन्यात मुंबईच्या घाटकोपर येथे अवैध होर्डिंग पडून 17 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण राज्यभर याचे पडसाद उमटले, दरम्यान, प्रत्येक शहरात अवैध होर्डिंगवर कारवाई करण्यात आली. मात्र, गोंदिया नगर परिषद प्रशासनाने यापासून बोध घेतले नाही. त्यात हे दुर्लक्ष एका युवकाच्या जीवावर बेतले. विद्युत खांबावरील होर्डिंग काढत असताना करंट लागून त्या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवार (ता.18) रात्री 11 वाजताच्या सुमारास घडली. आकाश नागरीकर (वय 25 रा. छोटा गोंदिया) असे त्या युवकाचे नाव आहे.

Advertisements

गोंदिया शहरातील सिव्हिल लाईन येथील हनुमान मंदिर चौपाटीजवळील विद्युत खांबावरील होर्डिंग काढत असताना आकाशाला विद्युत करंट लागला. यावेळी घटनास्थळावर उपस्थित काही लोकांनी त्याला शहरातील केटीएस जिल्हा रुग्णालयात नहलविले. यावेळी, तेथील डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. विशेष म्हणजे, गोंदिया शहरात मोठमोठ्या शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस, व्यापारी वर्ग, राजकारणी यांचे होर्डिंग नगरपरिषदेची परवानगी न घेता बेकायदेशीरपणे लावले जातात. त्यामुळे शहराचे संपूर्ण विदृपीकरण झाले आहे. एकंदरीत शहर छोटे मात्र, होर्डिंगच मोठे अशी अवस्था आहे. या प्रकाराला घेऊन गोंदियाकरांनी नगरपरिषदेकडे अनेक तक्रारी केल्या, सामाजिक संघटनांनी मुख्याधिकाऱ्यांकडे अनेक वेळा तक्रारीदेखील केल्या. मात्र, प्रशासनाचे याकडे नेहमीच दुर्लक्ष झाले. याच दुर्लक्षामुळे शहरात दुर्दैवी घटना घडून आकाशला आपला जीव गमवावा लागला. दरम्यान, या घटनेमुळे शहरातील काही सामाजिक संघटनांनी नाराजी व्यक्त करत आज, (ता.19) नगरपरिषदेच्या दुर्लक्षित कारभाराचा विरोध करून नगर परिषद कार्यालयात ठिय्या आंदोलन केला. व होर्डिंग लावणाऱ्यांवर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची मागणी नगर परिषद प्रशासनाकडे केली.

◼️होर्डिंग लावणाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा….

18 जून रोजी रात्री घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे शिवसेनेकडून तिव्र संताप व्यक्त करण्यात आला असून होर्डिंग लावणारे व या घटनेला जबाबदार असलेल्या सर्व दोषींवर पोलिसांनी मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा, अशी मागणी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने करण्यात आली आहे.

Advertisements

००००००००००००