गांधी जयंती निमित्य मोदीजींच्या आवाहनाला प्रतिसाद देत वाठोडा येथे राबविले स्वछता श्रमदा
नागपूर. देशाचे मा. पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांनी केलेल्या आवाहनावरून आज रविवारी १ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती निमित्त ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत वाठोडा येथे भाजप प्रदेश उपाध्यक्ष व माजी नगरसेवक ॲड. धर्मपाल मेश्राम यांच्या नेतृत्वात नागरिकांनी स्वच्छतेसाठी श्रमदान केले.
वाठोडा येथील स्वच्छता श्रमदानामध्ये प्रभाग भाजप अध्यक्ष सुरेश बारई, मनपा कर्मचारी यूनियन चे सरचिटणीस लोकेश मेश्राम, स्वास्थ्य विभाग जमादार सोनम बागडे, प्रकाश जवादे, भटक्या विमुक्त मोर्चा अध्यक्ष किशोर सायगण, विक्रम डुंबरे, दीपक खरे, शंकर मेश्राम, विजय वासनिक, सूरज शेंडे, अर्चना भोवते, अर्चना रामटेके, संध्या मेश्राम, सुचिता मेश्राम, कृष्णा जांभूळकर आदींनी सहकार्य केले.