“गजर विठ्ठलाचा” सायंटिफिक सभागृहात आज
नागपुर (देवराव प्रधान ) संस्कृती इव्हेन्टस नागपूर प्रस्तुत सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारी एक नामवंत संस्था आपल्या साठी एक सुंदर कार्यक्रम आषाढी एकादशी निमित्त घेऊन येत आहे. मराठी माणसाच्या मनावर संत साहित्याचे, अभंगाचे गारूड आहे. त्यामुळे त्या अभंगांचे गायन करणे, श्रवण करणे हा त्याच्या श्रध्देचा विषय आहे. शतकानुशतके ह्या पदांची गोडी अखंड आहे.
त्यामुळेच त्यांच्या निवडक अभंगांचा कार्यक्रम “गजर विठ्ठलाचा” ह्या शीर्षकाने शनिवारी २७ जुलै रोजी, संध्याकाळी ६.३० वाजता. लक्ष्मीनगर आठ रस्ता चौकातील सायंटिफिक सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
पियाली बिश्वास यांची संकल्पना असून नागपुरातले प्रसिद्ध गायक कलाकार गुणवंत घटवई, डॉ मंजिरी वैद्य अय्यर, मुकुल पांडे, श्रेया खराबे टांकसाळे रसिकांच्या आवडीच्या संत रचना सादर करतील. या कार्यक्रमाचे संगीत संयोजक परिमल जोशी असून निवेदन किशोर गलांडे करतील. कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून निःशुल्क आहे. सर्वांनी कार्यक्रमाला अवश्य यावे व आस्वाद घ्यावा. अशी विनंती संस्कृती इव्हेंटस्च्या पियाली बिस्वास यांनी केली आहे.