केवळ महिलांची जबाबदारी नाही.हा संदेश अनेक जोडप्यांच्या मनाला भिडला.
Nagpur WH NEWS – यावर्षीच्या सुरुवातीला विम इंडिया यांनी ‘इक्वल वोज’ (Equal Vows) नावाची मोहीम सुरू केली, ज्याचा उद्देश म्हणजे विवाहात समानता प्रोत्साहित करणे. या मोहिमेचा संदेश सोपा होता —घरकामाची जबाबदारी दोघांनीही वाटून घ्यावी, ती केवळ महिलांची जबाबदारी नाही.
या जाहिरातीत अभिनेते राजकुमार राव आणि पत्रलेखा यांनी भाग घेतला होता. त्यांनी नात्यातील समतोल आणि परस्पर सन्मानाचे महत्त्व अधोरेखित केले. हा संदेश अनेक जोडप्यांच्या मनाला भिडला.
या कल्पनेला फक्त पडद्यापुरते मर्यादित न ठेवता, विम इंडीयाने महाराष्ट्रातील यवतमाळ येथे एक सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यासाठी ‘सत्चिकित्सा प्रसारक मंडळ’ या स्वयंसेवी संस्थेशी भागीदारी केली. या सामूहिक विवाह सोहळ्यात 120 जोडप्यांनी केवळ प्रेमाचे नव्हे, तर घर सांभाळण्याच्या समान जबाबदारीचेही वचन दिले.
विवाहसोहळा पार पाडणाऱ्या पुरोहितांनी नमूद केले की “पती आणि पत्नी दोघांनीही घरातील जबाबदारी समानपणे घ्यायला हवी.”
ही मोहीम अनेक घरांमध्ये आणि सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. या मोहिमेने पारंपरिक विचारसरणीला आव्हान दिले आणि बदल घडवून आणण्याची प्रेरणा दिली. या अनुषंगाने एक पॅनल चर्चा आयोजित करण्यात आली, जिथे विवाहित जोडपी, समाजसेवक आणि तज्ञांनी अशा उपक्रमांमुळे कसे समान भागीदारीचे संबंध निर्माण होऊ शकतात, यावर विचारमंथन केले. चला तर मग, त्या चर्चेतील काही महत्त्वाचे क्षण पाहूया.