हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी मानले नागपूरकरांचे आभार

spot_img

केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी मानले नागपूरकरांचे आभार

नागपूर : नागपूर लोकसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्या वेळी विजयी केल्याबद्दल केंद्रीय मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी समस्त नागपूरकर जनता आणि भाजप कार्यकर्त्यांचे आभार मानले.*

नागपूर महानगर भाजपच्या वतीने मानकापूर येथील इनडोअर स्टेडियम मध्ये स्नेहामिलन सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी नागपूर महानगर भाजपच्या वतीने ना. श्री. गडकरी यांचा जाहीर सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. यावेळी सौ. कांचन गडकरी, प्रसिध्द उद्योजक सत्यनारायण नुवाल, बैद्यनाथचे संचालक सुरेश शर्मा, भाजप शहराध्यक्ष जितेंद्र कुकडे, माजी खासदार अजय संचेती, माजी खासदार डॉ. विकास महात्मे, माजी खासदार कृपाल तुमाने, आमदार रामदास आंबटकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत पवार, माजी आमदार अनिल सोले, माजी आमदार अशोक मानकर, माजी महापौर दयाशंकर तिवारी, जयप्रकाश गुप्ता, नितीन टेलगोटे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर आणि भाजप कार्यकर्ते व चाहत्यांनी ना. श्री. गडकरी यांना प्रत्यक्ष भेटून त्यांचे अभिनंदन केले.

Advertisements

नितीन मुकेश यांच्या गाण्यांची मेजवानी

स्नेहमिलन कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रसिद्ध ज्येष्ठ गायक नितीन मुकेश यांच्या गाण्यांची मेजवानी नागपूरकरांना मिळाली. स्वतःच्या गाण्यांसह थोर गायक मुकेश यांचीही गाणी त्यांनी सादर केली. ना. श्री. नितीन गडकरी यांचे अभिनंदन करून त्यांनी नागपूर हे माझ्यासाठी आता दुसरे घर झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी नितीन मुकेश यांचे चिरंजीव नमन हे देखील उपस्थित होते.