केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज नागपुरात आगमन
नागपूर – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उद्या 26 एप्रिल रोजी रात्री नागपूर येथे आगमन होणार आहे. 27 एप्रिल रोजी जामठा येथील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित राहतील.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे 26 एप्रिल रोजी रात्री दहा वाजता आगमन होणार आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सायंकाळी 7.15 वाजता आगमन होईल. उद्या रात्री ते नागपूर येथे मुक्कामी असून 27 एप्रिलला सकाळी 10.30 वाजता जामठा येथील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट येथे उद्घाटन सोहळयास उपस्थित राहतील.
26 व 27 एप्रिलला वाहतुकीत अंशत: बदल
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नागपूर येथील कार्यक्रमामुळे 26 व 27 एप्रिलला वाहतुकीत अंशत: बदल करण्यात येत आहे. आवागमनाचे संपूर्ण मार्गावर सुरक्षेच्या दृष्टीकोणातून नागपूर वाहतूक पोलीसांकडून वाहतुकीचे दृष्टीने विविध ठिकाणी वाहतूक वळती करण्यात येणार आहे. विमानतळाकडे जाणाऱ्या रोडवर यादरम्यान गर्दी राहील, तरी या मार्गावर रात्री व सकाळी प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांनी आपल्या प्रवासाचे नियोजन करावे.
नागपूर शहरातील सर्व वाहन चालकांनी वाहतूक नियमाचे पालन करावे व पोलीसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस उपायुक्त चेतना तिडके यांनी केले आहे.