हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दीक्षाभूमीला शरण..!भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिकलशाचे घेतले दर्शन….मात्र रमाईचे केले नाही अभिवादन

spot_img

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दीक्षाभूमीला शरण..!भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिकलशाचे घेतले दर्शन….मात्र रमाईचे केले नाही अभिवादन

नागपूर, दि 18 : केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी शनिवारी सकाळी नागपुरच्या दीक्षाभूमीला शरण गेले.गृहमंत्री अमित शाह यांच्यासह राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेतले.मात्र अगदी समोर असलेल्या माता रमाई च्या पुतळयाचे दर्शन घेतले नाही.

आमित शाह व देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दर्शनानंतर बुद्धवंदना केली. दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव सुधीर फुलझेले आणि सदस्य डॉ.राजेंद्र गवई, प्रा. डी. जे. दाभाडे,प्रा.आगलावे, विलास गजघाटे,भंते दीपंकर आदींनी श्री. शाह आणि श्री. फडणवीस यांचे स्वागत केले. मान्यवरांना सन्मानचिन्ह ,शाल आणि ‘बुद्ध अँड हिज धम्म’ हे पुस्तक देण्यात आले.दीक्षाभूमीच्या व्हीजिट बुक मध्ये आपली प्रतिक्रिया सुद्धा अमित शाह यांनी नोंदविली.

Advertisements

आमदार चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रवीण दटके, माजी मंत्री राजकुमार बडोले, जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटणकर आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी मात्र नागपुरच्या मिडियाला आत येण्यास परवानगी दिली नाही.ऐका मोठ्या टीवी चॅनल च्या प्रतिनिधिने जाण्याचा प्रयत्न केला असता त्याला पोलिसांनी बाहेर काढले.त्यामुळे मिडियात अमित शाह दौऱ्या विषयी नाराजगी आहे.देशाच्या प्रधानमंत्री दौऱ्यात मिडियाला प्रवेश असतो तर गृहमंत्री आले असता प्रवेश का नाही असा प्रश्न डिजिटल मिडियाने उपस्थित केला.