किरण पाटणकर यांचे अल्पशा आजराने निधन …भीमराज की बेटीचा आवाज हरपला..नामवन्त कलाकारा सोबत झाले सामने
नागपुर -सुप्रसिद्ध कव्वाल नागोराव पाटणकर यांची मुलगी किरण पाटणकर यांचे आज सोमवार दिनांक 5 फेब्रुवरी रोजी अल्पशा आजराने निधन झाले. त्यांचा अंत्यसंस्कार वैशाली घाट येथे करण्यात .किरण पाटणकर यांच्या निधनाने कव्वाली क्षेत्रात शोक पसरला आहे.
किरण पाटणकर यांनी आपल्या भीम बुद्ध गितांच्या मध्यमातुन ओळख निर्माण केली होती.त्या हिंदी,मराठी,उर्दू मधुन गाने गात होत्या.शेवटच्या क्षणा पर्यंत त्यांनी गाण्यातून समाज प्रबोधन केले.
त्या राजकारणात सुद्धा सक्रिय होत्या बहुजन समाज पार्टी च्या नगरसेवक सुद्धा झाल्या त्या नंतर त्यांनी रामटेक लोकसभा निवडणुकीत सुद्धा आपले वर्चस्व कायम ठेवत बसपा कडून निवडणूक लढली.
त्यांच्या अचानक जाण्याने कला क्षत्रात् तसेच राजकीय क्षेत्रात मोठी हानी झाली.सोमवारी त्यांच्या बेझबाग निवास स्थानावरुन अंतिम यात्रा निघाली व वैशाली घाट येते बुद्ध संस्कार करण्यात आले. मंगळवारी सकाळी 10 वाजता कन्हान घाटावर अस्थि विसर्जन करण्यात येईल.महाराष्ट्रातील कलावंतांनी किरण पाटणकर यांच्या निधनाचे दुःख व्यक्त केले.
गायिका किरण पाटणकर यांचा जन्म अमरावतील जिल्ह्यातील बडनेरा येथे झाला. पुढे काही काळानंतर किरण पाटणकर या नागपूरला राहण्यास गेल्या. किरण पाटणकर यांचे वडील नागोराव लोकप्रिय कवी होते. तसेच त्यांचे भाऊ प्रकाशनाथ पाटणकर देखील प्रसिद्ध गायक आहेत.किरण पाटणकर यांना बालपणापासून गायनाची आवड होती. किरण पाटणकर यांना त्यांच्या गायकीने त्यांना एक वेगळी ओळख निर्माण करून दिली होती. आनंद शिंदे, जानीबाबू यांच्याशी त्यांचा कव्वालीचा सामना व्हायचा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमात किरण पाटणकर यांना भीमगीतांची फर्माईश ठरलेली असायची. किरण पाटणकर यांनी शेकडो भीमगीत गायली आहे. त्यांच्या गीताच्या कॅसेट्स लोकांमध्ये प्रचंड लोकप्रिय होत्या. किरण पाटणकर यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीचा आवाज हरपल्याची भावना मान्यवरांनी व्यक्त केली आहे.
तत्पूर्वी, किरण पाटणकर यांचं ‘भीमराज की बेटी मै तो जयभीमवाली हूँ’ हे त्यांचे गाणे विशेष गाजले होते. त्यांनी २०१४ साली बहुजन समाज पार्टीतर्फे रामटेक लोकसभा निवडणूक लढवली होती. नागपूर महापालिकेत बसपाच्या नगरसेविका म्हणून त्या निवडून आल्या होत्या.