कसूरी अहवालानुसार दोन पोलीस अधिकाऱ्यासह एका कर्मचाऱ्याची बदली
-कन्हान पोलीस स्टेशन : प्रकरणात पैसे घेणे भोवले…रिपब्लिकन भीमशक्तीच्या निवेदनाची दखल..!
नागपुर कन्हान : कन्हान पोलीस स्टेशन येथे कार्यरत ASI गणेश रमेश पाल , ASI सदाशिव काठे व Npc महेंद्र जळतीकर यांना कसूरी अहवालानुसार नागपुर ( ग्रा ) चे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी बदलीचे आदेश दिले आहे तत्काल प्रभावाने ज्यात गणेश पाल यांची नरखेड़ , सदाशिव काठे यांची वेलतुर तर महेंद्र जळतीकर यांची जलालखेड़ा पोलीस स्टेशन येथे बदली करण्यात आली आहे व त्यांची विभागीय चौकशी सुद्धा शुरू करण्यात आली आहे.
कन्हान येथे कार्यरत दोन अधिकारी व एक कर्मचारी यांनी एका अपघात प्रकरणात निर्दोष गाड़ी मालकालाकडून पैसे घेतले तर एका अधिकाऱ्यांनी त्याच प्रकरणात पुन्हा पैश्याची मागणी करत प्रकरणात दिशाभूल करून गाड़ी मालकाची मानसिक पिळवणुक केली असता याबाबद रिपब्लिकन भीमशक्तिचे चंद्रशेखर भिमटे यांनी सदर गाड़ी मालकाची बाजू मांडता कन्हान पोलीस निरिक्षक सार्थक नेहते कड़े लेखी तक्रार केली ज्यात पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक भटकर यांनी करत कसूरी अहवाला सादर केला ज्यात कर्तव्यदक्ष पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी प्रकरणाची शहनिशा करून त्यांची इतर ठिकाणी बदलीचे आदेश दिले असून नागपुर ग्रा च्या नरखेड़ , वेलतुर आणि जलालखेड़ा येथे बदली करण्यात आली आहे.
*अपघात प्रकरणात पैसे घेणे आणि दिशाभूल करने भोवले* : कन्हान पोलीस स्टेशन हद्दीततील महामार्ग क्रमांक 44 वर अपघातामध्ये एमपी 20.बीए 7850 चार चाकी गाडीला दुचाकी क्रमांक एमएच 40 आर 6595 ने धडक दिली होती.सदर प्रकरणात पोलीस अधिकारी व कर्मचारी ने दोषी नसतांना चार चाकी गाडी मालक रणमत नंहुलाल मरावी रा.मध्यप्रदेश यांच्या कडून गाडी सोडण्याच्या नावाखाली बळजबरीने, परिचित व्यक्तीच्या खात्यात ऑनलाईन पैशे टाकण्यात बाध्य केले. गाडी चालकाने उदनिर्वाहचे साधन भेटणार या करिता सदर व्यक्तीच्या खात्यात फोनपे द्वारे ऑनलाईन 8000 रुपये बुधवार दिनांक 16/08/2023 रोजी टाकले, मात्र अजून पैशे मिडविण्यासाठी सलग दोन महिने गाडी चालकाला मानसिक व शारीरिक त्रास देण्यात आले.
तर इतर तपासी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तपासाच्या नावाखाली गाडीवर कुठलाही गुन्हा दाखल नसतांना गाडी ठाण्यात ठेवली. सदर प्रकरणात दोषी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करून नीलंबित करण्याची मागणी रिपब्लिकक भीमशक्ती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर भिमटे यांनी कन्हान पोलीस स्टेशन ठाणेदार सार्थक नेहते यांना निवेदन देऊन दिले असता, निवेदन देताच पोलिसांनी गाडी मालकाला गाडी सोपविले असून प्रकरणाची पारदर्शी चौकशी होणार असल्याचे आश्वासन ठाणेदार सार्थक नेहते यांनी दिले होते.