कष्टकरी, कामकरी माणसाच्या समस्या दूर झाल्या पाहिजे
◾️बच्चू कडू यांचे प्रतिपादन
गोंदिया : माझ्या कष्टकरी, कामकरी गोरगरिबांच्या समस्या मार्गी लागणे गरजेचे आहे. ज्या योजना मोठ्यांना मिळतात, त्या योजना गोरगरिबांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे. शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतच नाही, मायबाप शेतकऱ्यांना न्याय देऊन, शेतकरी, कष्टकऱ्यांची ही आमची लढाई आहे, ज्यांना हात नाही, पाय नाही, डोळे नाही, अशा दिव्यांग व्यक्तींसाठी ही संघटना धावून जाते, माझे हात मजबूत करण्यासाठी डॉक्टर सुगत चंद्रिकापुरे यांना आमदार करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन बच्चू कडू यांनी केले.
प्रहार संघटनेचे अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे उमेदवार डॉ. सुगत मनोहर चंद्रिकापुरे यांच्या निवडणूक प्रचारार्थ (ता. 10) सडक अर्जुनी येथील पंचायत समिती जवळील मैदानात आयोजित सभेत ते बोलत होते. पुढे ते म्हणाले सरकार शेतकऱ्यांना धानासाठी जो भाव ठरवून देते त्यामध्ये शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लुबाडणूक होत असून शेतकऱ्यांनी जागे होण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. प्रसंगी, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, प्रहारचे उमेदवार डॉ. सुगत चंद्रिकापुरे, किरण कोरे आदी मान्यवरांनीही मार्गदर्शन केले.यावेळी प्रहारचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर, तिरोडाच्या पंस सदस्य वनिता भंडारकर, वसंत गहाणे, सरपंच माधव तरोणे, गोंडवाना गोंड तंत्र संघटनेच्या जिल्हा महिला अध्यक्ष छाया टेकाम, मंगेश देशमुख, राष्ट्रपाल तेलतुंबडे, दुलाराम चंद्रिकापुरे, प्रतिभा कुंभरे, मंजुषा चंद्रिकापुरे, दिव्या चंद्रिकापुरे, शशिकला टेंभुर्णी, रघुनाथ चुटे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन राहुल यावलकर यांनी तर आभार चंद्रशेखर चांदेवार यांनी मानले. सभेला हजारोच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
◾️बॅटने पंज्याला तोडा, घडीला चकनाचुर करा : डॉ. सुगत चंद्रिकापुरे
या क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला वाढविण्याचे काम आम्ही प्रामाणिकपणे केले. मात्र, आमच्यावर अन्याय करण्यात आला. दुसऱ्या पक्षाच्या व्यक्तीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घेऊन उमेदवारी घोषित करण्यात आली, हे आम्हाला कळलेच नाही. आता अशा पक्षांच्या उमेदवारांना धडा शिकवण्याची गरज आहे. माझे निशान बॅट आहे. या बॅटने पंजाला तोडा व घडीला चकनाचुर करून मला विजयी करा, असे आवाहन प्रहार पक्षाचे उमेदवार डॉ.सुगत चंद्रिकापुरे यांनी आयोजित प्रचार सभेत मतदारांना केले.
००००००००