हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

कवि वामनदादा कर्डक स्मृति दिन विशेष..! तत्वांची जाण असती…बिनडोक लोक नसते

spot_img

कवि वामनदादा कर्डक स्मृति दिन विशेष..! तत्वांची जाण असती…बिनडोक लोक नसते

भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते,
तलवारीच्या तयांच्या न्यारेच टोक असते…..

….तत्वाची जाण असती, बिनडोक लोक नसते…
…बिनडोक लोक नसते
सारे चलन तयांचे ते रोखठोक असते !

Advertisements

___वामनदादा कर्डक यांच्या गाण्यातील हे अमर बोल !

ही काव्यरचना करतांना/गातांना वामनदादांच्या सम्यक दृष्टीपटलापुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘रिपब्लिकन पक्षासाठी आखून दिलेली, वेळोवेळी आपल्या भाषणांतून अधोरेखित केलेली ‘जगातील सर्वश्रेष्ठ अशी मानव मुक्तीची तत्वे’ तरळून उभी राहिली नसतील काय?

1936 ला बाबासाहेब मानवी जीवनात तत्वांचे महत्व विशद करतांना म्हणतात, “Principles are intellectual; they are useful methods of judging things.” असे मांडतात.

Advertisements

आणि पुढे 1956 ला ‘The Buddha and His Dhamma’ हा धर्मग्रंथ लिहितांना बुद्धाने तत्वांबाबत मांडलेलं मत/बुद्धविचार उद्धृत करतात. ज्यात तथागत बुद्ध म्हणतात, “The recognition of these principles, I say, is most essential for every man. For every man must have a standard by which to judge whatever he does. And these principles according to my teachings constitute the standard.”

बुद्धाचे हे वरील विधान जरी पंचशील तत्वांच्या बाबतीत असले तरी त्यातून एकूणच मानवी जीवनात ‘तत्वांचे’ (Principles) अनन्यसाधारण महत्व विशद केलेले आढळते. एवढेच नव्हे तर तर त्यास मानवी जीवनाच्या दर्जाचे मोजमाप करण्याचे प्रमाण/ मोजपट्टीचं म्हटले आहे!

मित्रांनो, अशी मोजपट्टी ज्या तत्वांना अनुसरून बाबासाहेबांनी आपल्यापुढे मांडली आहे, ज्यास त्यांनी जीवनतत्वे (Principles of life) म्हणून मान्यता दिली आहेत, त्यांचा स्वीकार करून, स्वतःला बाबासाहेबांचे अनुयायी म्हणविणारे आपण सर्व, आपल्या जीवनात त्या तत्वांची संघटीतरीत्या अंमलबजावणी करण्यासाठी पुढे धजावणार आहोत की नाही? की वामनदादांच्या म्हणण्याप्रमाणे असेच आपण बिनडोक होऊन प्रवासरत राहणार आहोत? ….वामनदादांना विनम्र अभिवादन ! 💐💐💐

Advertisements

साभार प्रशिक आनंद फेसबुक