हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

कवि प्रताप वाघमारे लिखित ‘सांजार्त ‘ ला पसायदान राज्यस्तरीय काव्यपुरस्कार जाहीर

spot_img

कवि प्रताप वाघमारे लिखित ‘सांजार्त ‘ ला पसायदान राज्यस्तरीय काव्यपुरस्कार जाहीर
नागपुर – यंदा दशकपुर्ती साजरी करणा-या मु .पो. गुहागर .जि. रत्नागिरीच्या ‘पसायदान’ राज्यस्तरीय पुरस्कार २०२३ची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे.त्या मध्ये सावनेरचे तहसीलदार कवि प्रताप वाघमारे यांच्या सांजार्त या कविता संग्राहला पसायदान राज्यस्तरीय काव्यपुरस्कार जाहीर करण्यात आला.

२०१४वर्षापासून पसायदान प्रतिष्ठान गुहागर यांच्या वतीने महाराष्ट्रातील गुणवत्तापूर्ण आणि सकस लेखन करणाऱ्या कवींना हा ‘पसायदान’राज्यस्तरीय काव्य पुरस्कार दिला जातो .आतापर्यंत महाराष्ट्रातील अनेक मान्यवर कवींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.(श्री संतोष कांबळे, गीतेश शिंदे, सचिन गांगुर्डे, डी के शेख, संजय चौधरी,मांगीलाल राठोड,साईनाथ पाचारणे,अनिल पाटील,प्रमोदकुमार अणेराव ,रमजान मु्ल्ला,हबीब भंडारे आदि ते माधुरी मरकड, प्रतिभा सराफ) मागविलेल्या प्रवेशिकांतून उत्कृष्ठ कवितासंग्रहासाठी हा सदर पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

नुकतेच वर्ष २०२२च्या काव्यसंग्रहांसाठीचे” पसायदान राज्यस्तरीय काव्यपुरस्कार “मान्यवर परीक्षकांकडून जाहीर करण्यात आले आहेत. यात *सुप्रसिद्ध कवी आबासाहेब पाटील( मुनशी, बेळगाव )यांच्या “घामाची ओल धरून” , तसेच प्रसिद्ध लेखक, समीक्षक, बालसाहित्यिक, राष्ट्रपती पुरस्कार विजेते, डाँ श्रीकांत पाटील (कोल्हापुर, घुमकी ,)यांच्या “झाडोरा” आणि प्रशासकीय सेवेत असून साहित्यक्षेत्रात आपलं स्थान मिळविणारे, सावनेर तालुक्याचे तहसीलदार व कवी प्रताप वाघमारे (नागपूर) यांच्या “सांजार्त” या कवितासंग्रहाला या कवितासंग्रहांना हा *पसायदान*राज्यस्तरिय काव्यपुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

Advertisements

लवकरच या पुरस्कारप्राप्त कवींना मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ साहित्यिकांच्या हस्ते चिपळूण येथे जागर साहित्य संमेलनात या पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल असे पसायदान प्रतिष्ठान यांच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.WH न्यूज़ कडून प्रताप वाघमारे यांचे अभिनंदन