कधी असाध्य असलेल्या बेसिलर आर्टरी फ्यूसिफॉर्म एन्युरिझमचा – आधुनिक फ्लो डायव्हर्जन तंत्रज्ञानाचा वापर करून यशस्वी उपचार केला गेला.
नागपुर नोव्हेंबर 2023, – वोक्हार्ट हॉस्पिटल्स नागपूर: वोक्हार्ट हॉस्पिटल्स नागपूर, एक अग्रगण्य आरोग्य सेवा प्रदाता, ने मेंदूची मोठी शस्त्रक्रिया टाळून एकेकाळच्या असाध्य बेसिलर आर्टरी फ्यूसिफॉर्म एन्युरिझमच्या रूग्णावर आधुनिक फ्लो डायव्हर्जन तंत्रज्ञानाने यशस्वी उपचार केले. ही अशा प्रकारची एक अभिनव प्रक्रिया होती ज्यामुळे मोठी शस्त्रक्रिया टाळली गेली आणि रुग्णाचा जीवही वाचला.
मिस्टर आरएम, 36 वर्षांच्या पुरुषाला दिवाळीच्या सुट्टीत घरी असताना अचानक आणि त्रासदायक डोकेदुखीचा अनुभव आला. ही वेदना त्याच्या आयुष्यातील सर्वात वाईट डोकेदुखी होती ज्याचे वैद्यकीय भाषेत थंडर कॅलॅप असणारी डोकेदुखी म्हणून वर्णन केले जाते. मेंदूच्या सीटी स्कॅन मध्ये असे दिसून आले की रुग्णाला सबराक्नोइड ब्रेन हॅमरेज झाला आहे जो एक जीवघेणा आजार आहे कारण या आजारात 20-30% रुग्ण हॉस्पिटलमध्ये ही पोहचू शकत नाही . सबराक्नोइड रक्तस्राव म्हणजे मेंदूच्या सभोवतालच्या जागेत रक्तस्त्राव होतो.
रुग्णाला आकडी आणि हायड्रोसेफ्लस विकसित होऊन प्रकरण आणखी गुंतागुंतीचे झाले आणि जेव्हा तो हॉस्पिटल मध्ये पोहोचला तेव्हा तो बेशुद्ध अवस्थेत होता. हायड्रोसेफलस म्हणजे मेंदूच्या आत खोलवर असलेल्या वेंट्रिकल्स नावाच्या पोकळ्यांमध्ये द्रव जमा होणे. अतिरिक्त द्रव वेंट्रिकल्सचा आकार वाढवते आणि मेंदूवर दबाव टाकते .
रुग्ण वोक्हार्ट हॉस्पिटल नागपूर येथे आल्यावर , डॉ. अमित भट्टी , जे शहरातील अग्रणी इंटरव्हेंशनल न्यूरोलॉजिस्ट आणि स्ट्रोक तज्ज्ञ आहेत, यांनी आपत्कालीन ब्रेन डिजिटल सबट्रक्शन अँजिओग्राफी केली जी मेंदूच्या विविध प्रकारच्या रक्त्त वाहिन्यांचा आजारासाठी वापरली जाते. त्यात बेसिलर आर्टरीच्या मध्यभागी फ्युसिफॉर्म एन्युरिझम (रक्तवाहिनीच्या भिंतीमध्ये फुगवटा) असल्याचे दिसून आले. काही दशकांपूर्वी हा असाध्य होता कारण एन्युरिझमच्या स्थानामुळे शस्त्रक्रिया करणे जवळजवळ अशक्य होते आणि आकारामुळे एंडोव्हस्कुलर उपचार देखील एक आव्हान बनते.
तथापि, डॉ भट्टी यांनी निदर्शनास आणून दिले की इंटरव्हेंशनल न्यूरोलॉजी आणि फ्लो डायव्हर्टर स्टेंट सारख्या उपकरणांच्या विकासामुळे हे विकार आता सहज उपचार करण्यायोग्य आहेत. डॉ भट्टी यांच्या म्हणण्यानुसार, फ्लो डायव्हर्टर स्टेंट हा एक विशेष स्टेंट आहे ज्यामध्ये खूप जास्त जाळीची घनता असते जी एन्युरिझम सॅकमधून रक्त प्रवाहाचे पुनर्निर्देशन करण्यास अनुमती देते ज्यामुळे एन्युरिझम बरे होऊ शकते आणि अशा प्रकारे या दुर्मिळ प्रकारच्या एन्युरिझमवर उपचार करणे शक्य होते जे पूर्वी असाध्य होते.
डॉ. अमित भट्टी हे एम.डी.डी.एम. (न्यूरो) डी.एन.बी (न्यूरो) एफआयएनएस (इंटरव्हेंशनल न्यूरोलॉजी आणि स्ट्रोक) कंन्सल्टंट – इंटरव्हेंशनल न्यूरोलॉजिस्ट, आहेत आणि त्यांच्या कौशल्याने त्यांनी कवटीची कोणतीही शस्त्रक्रिया न करता पायाच्या आर्टरीच्या सुईच्या आकाराच्या पंक्चरद्वारे ही संपूर्ण प्रक्रिया केली.
श्री अभिनंदन दस्तेनवार , सेंटर हेड, वोक्हार्ट हॉस्पिटल्स नागपूर म्हणाले “मोठी शस्त्रक्रिया टाळून आमच्या डॉक्टरांनी पुन्हा एकदा त्यांचे कौशल्य सिद्ध केले आहे आणि एक जीव वाचविण्यात मदत केली आहे.