हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

ओबीसीच्या बैठकीत विरोधकांना का डावलले ? – अनिल देशमुख

spot_img

ओबीसीच्या बैठकीत विरोधकांना का डावलले ? – अनिल देशमुख
नागपूर – २९ सप्टेंबरला मुंबई येथे ओबीसी समाजाच्या मागण्यासंदर्भात बैठक आयोजीत केली आहे. परंतु या बैठकीतुन ओबीसीच्या आंदोलनात काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या सक्रिय सहभाग असलेल्या विरोधी पक्षाच्या नेत्यांना या बैठकीतुन का डावलण्यात आले असा सवाल माजी गृहमंत्री आमदार अनिल देशमुख यांनी राज्य सरकारला विचारला आहे.

मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या सदंर्भात राज्य सरकार प्रयत्न करीत आहे. यात मराठा समाजाला सरसकट कुणबी समाजाचे प्रमाणपत्र देवून ओबीसीमधुन आरक्षण देण्याचा विचार राज्य सरकारचा आहे. परंतु यास कुणबीसह ओबीसी समाजाचा मोठया प्रमाणात विरोध आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा कोणाचाही विरोध नाही. परंतु केंद्र व राज्य सरकारने आरक्षणाची सिमा वाढवुन मराठा समाजाला वेगळे आरक्षण देण्याची मागणी मोठया प्रमाणात होत आहे. याकडे सुध्दा केंद्र व राज्य सरकारने लक्ष देण्याची गरज असल्याचे अनिल देशमुख यांनी सांगीतले.

 

ओबीसी समाजाच्या मागण्यासंदर्भात २९ सप्टेंबरला दुपारी २ वाजता सहयाद्री अतिथीगृह येथे बैठक बोलविण्यात आली आहे. यात प्रामुख्याने ओबीसी समाजाच्या कृती समीतीसह सर्व शाखीय कुणबी/ओबीसी आंदोलन समीतीच्या सदस्यांना बोलविण्यात आले आहे. हे चांगले झाले, पण सरकारने विरोधी पक्षाचे ओबीसी आंदोलनात सक्रीय असलेल्या नेत्यांना का बोलविले नाही? या उलट भाजपाच्या ७-८ आजी माजी आमदारांना या बैठकीला बोलविण्यात आले आहेत. परंतु या आंदोलनात सक्रीय असलेल्या विरोधी पक्षाच्या नेत्यांना का डावलण्यात आले? असा प्रश्न अनिल देशमुख यांनी उपस्थीत केला आहे.

Advertisements